सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :- बेलापूर विधानसभेच्या आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी यंदाची दिवाळी नवी मुंबईतील नेरूळ येथील आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांबरोबर साजरी केली. यावेळी आदिवासी बांधव आणि महिलांना फराळ, मिठाई व शालीचे वाटप करण्यात आले. यावेळी असंख्य आदिवासी नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्व आदिवासीमध्ये आनंदाचे वातावरण होते.
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील नागरिकांनी मला पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून दिल्यामुळे यंदाची दिवाळी ही माझ्यासाठी खास आहे. आज या गरीब व गरजू आदिवासी बांधवांच्या घरीही चांगली दिवाळी साजरी व्हावी, याकरिता त्यांच्यासह यंदाची दिवाळी मी साजरी करीत आहे. आज गरीबांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून आपली दिवाळी साजरी झाल्याचं मत आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केले. आदिवासी पाड्यातील नागरिक आजही अनेक सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना हव्या असलेल्या पाण्याची सुविधा व येण्या-जाण्यासाठी पायवाट येत्या 4 दिवसांत उपलब्ध करून देऊन त्यांना दिवाळीची भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आदिवासी पाड्यातील श्री. मुन्ना नाईक यांनी सांगितले की, आम्ही जेव्हा कधी ताईकडे आलो, आम्हाला त्यांनी कधीच निराश केले नाही. आमच्या सर्व समस्या त्यांनी त्वरित मार्गी लावल्या आहेत. आमचे नागरिकत्व असलेले कागदोपत्री पुरावे रेशनकार्ड, आधारकार्ड, बँकेचे खाते आदी सर्व त्यांनी मिळवून दिले. त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेव्हढेच कमी आहे. आज त्यांच्या बरोबर दिवाळी साजरा करताना खूप आनंद होत असल्याचे सांगत दिवाळी निमित्त ताईंनी दिवाळी भेट देऊन महागाईच्या काळात आम्हाला फार मोलाची मदत केल्याचं मत व्यक्त केलं.Attachments area