अॅड. महेश जाधव : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महाराष्ट्र नवी मुंबई चे( इंटक) च्या नेतृत्वाखाली कोपरखैरणे रेल्वे स्टेशन येथे नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या हस्ते रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी रिक्षा चालकांनी त्यांना सतावत असणाऱ्या प्रश्नांवर लढण्यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांना साकडे घातले. या वेळी नवी मुंबई इंटकचे उपाध्यक्ष बाळकृष्ण खोपडे (देशमुख) यांनी सांगितले की, अनेक दिवसापासून नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षा वाढल्यामुळे रिक्षा स्टॅण्ड कमी पडत आहेत. सिडको, प्रशासनाकडे मागणी केली असता, कोपरखैरणे येथे रिक्षा स्टॅण्ड उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, ती मागणी मान्य केली आहे. तसेच भविष्यात रिक्षा चालकांना सतावणाऱ्या प्रश्नांवर लढणार असल्याचे प्रतिपादन खोपडे(देशमुख) यांनी केले. या वेळी युनियनचे पदाधिकारी शंकरराव पडूळकरसह अजिंक्य चौगुले, संगीताताई टाकळकर, सह मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक उपस्थित होते.