श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सिडकोच्या इमारतीच्या स्लॅब कोसळण्याच्या घटना नवी मुंबईत नेहमीच घडत असतात. सिडकोने केलेल्या निकृष्ठ बांधकामाची किंमत सिडको सदनिकाधारकांना मोजावी लागत आहे. रविवारी (दि. २२) सकाळी नेरूळ सेक्टर १६ मधील सिडकोच्या दत्तकृप्पा सोसायटीतील एका सदनिकेत हॉलमध्ये स्लॅप कोसळला. नशिब घरातील महिला वर्ग स्वयंपाकघरात काम करत असल्याने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.
नेरूळ सेक्टर १६ मधील दत्तकृप्पा सोसायटीत बिल्डींग क्रमांक ए-४ सदनिका क्रं ३:४, द्वारकाबाई सिताराम शिरसाट यांच्या सदनिकेत हॉलमध्ये स्लॅब सकाळी १०.३० ते १०.४५ च्या सुमारास कोसळला. यावेळी हॉलमध्ये सुदैवाने कोणी नसल्याने कोणत्याही प्रकारची दुर्घटना झाली नसली तरी सदनिकेचे नुकसान झाले आहे. घटनेचे वृत्त कळताच भाजपचे स्थानिक भागातील नेते गणेशदादा भगत यांनी दत्तकृप्पा सोसायटीत धाव घेत शिरसाट परिवाराला दिलासा दिला. गणेशदादा भगत यांनी महापालिका विभाग कार्यालयाशी संपर्क साधत घडलेल्या घटनेची कल्पना दिली. विभाग अधिकारी संजय तायडे यांनी तात्काळ महापालिकेचे पथक पाठवित असल्याचे सांगितले.