अनंतकुमार गवई
मुंबई : सीएए, एनआरसी, एनपीआर आणि केंद्र सरकारच्या दमनाविरोधात छात्र भारती १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती (युवा दिन) पासून २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती पर्यंत विद्यार्थ्यांमध्ये सविनय कायदेभंग कृती कार्यक्रम संवाद मोहिम राबवणार आहेत.
विद्यापीठ आणि कॉलेज कॅम्पस, वसतीगृहे, मोहल्ले, सोसायटी इथं विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत छात्र भारतीचे विद्यार्थी पोचणार आहेत. २४ जानेवारीला दादरच्या हुतात्मा बाबू गेनू कामगार स्टेडियम मध्ये होणाऱ्या ‘हम भारत के लोग’ रॅलीत सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करणार आहोत, अशी माहिती छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी दिली आहे.