अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. अनेक मातब्बरांच्या पतंगाची दोर कापली गेल्यामुळे त्यांनी अन्यत्र आसरा शोधण्यास सुरूवात केली आहे. सर्वच पक्षाचे नगरसेवक शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजप यांचा आश्रय घेण्यास सुरूवात केलेली असतानाच बेलापुर विधानसभा मतदारसंघातील एक मातब्बर ग्रामस्थ शिवसेना नगरसेवकाने मनसेकडून लढण्याची चाचपणी सुरू केली असून त्याने दोन तिकिटांची मागणी केली आहे.
विधानसभा निवडणूकीत ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या गजानन काळे व निलेश बाणखिलेंचा चांगले मतदान प्राप्त झाल्याने नवी मुंबईत मनसेचा दबदबा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक मातब्बरांनी आपल्या पक्षाकडून तिकिट न मिळाल्यास मनसेकडून निवडणूक लढविण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. शिवसेनेच्या एका मातब्बर नगरसेवकाने मनसेला सभोवतालच्या प्रभागात विधानसभेला प्राप्त झालेले मतदान पाहता मनसेच्या नवी मुंबई बाहेरील मातब्बरांना शिवसेनेच्या नगरसेवकांने दोन तिकिटांची मागणी केली आहे. मनसेच्या गळाला अनेक मातब्बर पदाधिकारी लागण्यास सुरूवात झाल्याने आगामी महापालिकेत मनसेचा शिरकाव निश्चित मानला जात आहे.