भाग २- नवी मुंबई निवडणूक वार्तापत्र
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेकडे महापालिकेचे आठ प्रभाग असून या प्रभागामध्ये जयश्री ठाकूर, सुजाता पाटील, गिरीश म्हात्रे, श्रध्दा गवस, रूपाली भगत हे भाजपचे पाच नगरसेवक तर सुनिता मांडवे, काशिनाथ पवार, नामदेव भगत हे शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. सध्या सभागृहात नेरूळ पश्चिमला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा खातेफलक कोराच आहे. शिवसेना सुजाता पाटील, रूपाली भगत, श्रध्दा गवस, जयश्री ठाकूर या भाजपच्या चार जागा लढविण्यासाठी जय्यत तयारी करत असून गिरीश म्हात्रे या नगरसेवकाच्या प्रभागात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छूकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
एकेकाळी प्रभाग ९६ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांचा हा निवासी परिसर. २००५च्या निवडणूकीत विजय माने यांनी नामदेव भगत यांचा याच प्रभागातून पराभव करत जायंट किलरचा मान पटकावला होता. २०१० साली सतीश रामाणे यांनी बाजी मारत शिवसेनेचा बालेकिल्ला टिकविला होता. २०१५ सालच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे मातब्बर गणेश भगत यांच्या प्रभावामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला राष्ट्रवादी कॉग्रेसने खेचून घेतला. तब्बल एक हजाराहून अधिक मतांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रूपाली किसमत भगत येथून विजयी झाल्या. त्यानंतर गणेश भगत, रूपाली भगत, किसमत भगत व रवींद्र भगत यांनी जनसंपर्क व सामाजिका कामाकरिता आणि नागरी समस्या निवारण व नागरी सुविधांच्या उपलब्धतेकरीता या प्रभागात तळच ठोकल्याने आजमितीला या ठिकाणी भगत परिवाराच्या प्रभावाला खिंडार पाडणे सर्वानाच अवघड होवून बसले आहे. गणेश भगत हे गणेश नाईकांचे निष्ठावंत कार्यकर्ते. गणेश नाईकांसोबत ते व त्यांचा परिवारही भाजपात गेला. प्रभाग पुर्नरचनेत हा प्रभाग खुला झाला. या ठिकाणाहून शिवसेना शहरप्रमुख विजय माने, माजी नगरसेवक सतीश रामाणे यांच्यासह अन्य चार ते पाच नावांची चर्चा सुरू झाल्याने या प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेतच चुरस निर्माण झाली आहे.
मागील निवडणूकीत प्रभाग ९३ या ठिकाणाहून शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत विजयी झाले. प्रभाग पुर्नरचनेत हा खुला महिला राखीव झाल्याने नामदेव भगत यांच्या जागेवर शिवसेनेला नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे अथवा तीन वेळा नेरूळ गावच्या नगरसेविका असलेल्या इंदूमती भगत यांना तिकिट द्यावे लागणार आहे. या ठिकाणी भाजपातून निवडणूक लढविण्यासाठी देवनाथ म्हात्रे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु प्रभाग महिला राखीव झाल्याने या ठिकाणी भाजपला नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. हा प्रभाग शिवसेनेच्या नगरसेवकाचा असल्याने महाआघाडीतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला येथे दावा करता येणार नाही.
प्रभाग ९५ या प्रभागाचे महापालिकेत भाजपचे गिरीश म्हात्रे प्रतिनिधीत्व करत आहेत. मागील निवडणूकीत वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी गिरीश म्हात्रे राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांच्या विजयाची सर्वत्र चर्चा झाली होती. हा प्रभाग पुर्नरचनेत महिला राखीव झाल्याने भाजप गिरीश म्हात्रेंच्या घरातील महिलेला तिकिट देणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या ठिकाणी गिरीश म्हात्रे यांनी ५ वर्षात केलेली कामे पाहता व शिवसेनेकडे येथून फारसा प्रबळ उमेदवार नसल्याने महाआघाडीमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छूकांना हा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे.
प्रभाग ९७ हा शिवसेनेचा काही अंशी बालेकिल्ला. सध्या काशिनाथ पवार हे येथे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. हा प्रभाग पुर्नरचनेत महिला राखीव झाल्याने काशिनाथ पवारांच्या पत्नीला येथून शिवसेनेचे तिकिट निश्चित मानले जात आहे. तरीही शिवसेनेतील अन्य तीन-चार महिलांची नावे या प्रभागातून चर्चेत आहेत. भाजपकडून राजू तिकोणे, रमेश नरवडे, रवींद्र भगत यांच्यासह अन्य दोन नावांची चाचपणी असल्याचे बोलले जात आहे. महाआघाडीकडून हा प्रभाग शिवसेनेलाच जाणार असल्याचे निश्चित आहे.
नेरूळ पश्चिमेकडील आठ जागांपैकी तब्बल ७ जागा लढविण्यासाठी शिवसेनेकडे मातब्बर उपलब्ध असले तरी महाआघाडीकडून उमेदवारांची अदलाबदल (सातारा- नरेंद्र पाटील पॅटर्न) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रभाग ८६ मधील मनोज मेहेरांच्या उमेदवारीची सर्वत्र चर्चा सुरू झाली असून मनोज मेहेर हमखास ८६ मधून विजयी होणारा उमेदवार असे आतापासूनच बोलले जात आहे. त्यामुळे मनोज मेहेरने आपल्याकडून निवडणूक लढवावी यासाठी महाआघाडीतील व मनसेतील काही घटक प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. महाआघाडीचा झंझावात रोखण्यासाठी नेरूळ पश्चिमेला पाच विद्यमान नगरसेवकांसह स्वीकृत नगरसेवक सुरज पाटील यांच्यावर भाजपच्या नजरा खिळल्या आहेत.