Navimumbailive.com@gmail.com :- ९८२००९६५७३
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : जयवंत सुतार, नवी मुंबई महापालिकेचे विद्यमान महापौर. रोखठोक स्वभावाचा व खमक्या वृत्तीचा नावलौकीक असलेला माणूस. कितीही दबाव आला तरी जुमानणार नाही. जे जनतेच्या हिताचे आहे, तेच बोलणार, कोणाच्या दबावालाही नाही झुकणार. सध्या नामकरणाच्या प्रस्तावावर खमक्या जयवंत सुतारांनी आपल्या रोखठोक वृत्तीचे दर्शन नवी मुंबईकरांना व घरातल्या माणसांचे आणि नातेवाईकांचे नाव देवू पाहणाऱ्या नवी मुंबईकरांना पुन्हा एकवार घडविले. म्हणूनच शिरवणेच्या ‘दादूस तुसी आखिर ग्रेट ही हो’.
आचारसंहिता लागण्याअगोदरच्या महासभेत आपल्या प्रभागातील तलाव, स्मशानभूमी, सरकारी वास्तू, रस्ते व अन्य ठिकाणी आपल्या घरातील लोकांची, नातेवाईकांची नावे देण्याची चढाओढ नगरसेवकांना लागलेली असते. अनेकांनी त्यासाठी तशा हालचाली सुरू केल्या आहेत. पण या नामकरणात मोठा अडथळा ठरला आहे तो खमक्या वृत्तीच्या शिरवणेच्या ‘दादूस’चा. त्यांनी या प्रकाराला विरोध करत तशा आशयाचे पत्रही नवी मुंबई महापालिका प्रशासनाला सादर केले आहे. एक प्रकारे आपल्या रोखठोक बाण्याचे दर्शन घडवित अशा नामकरणासाठी प्रयत्नशील असलेल्या सर्वच नगरसेवकांना ‘दादूस’ने अंगावर घेतले आहे. देशातील, राज्यातील अथवा नवी मुंबईतील सामाजिक, शैक्षणिक, सहकार अथवा आंदोलनात्मक कामात नावाजलेल्या लोकांची नावे अशा ठिकाणी असावीत की जनतेला व भावी पिढीला त्यापासून बोध घेता येईल अशी भूमिका महापौर जयवंत सुतारांनी मांडली आहे. नवी मुंबईकरही या निर्णयामुळे आपल्या खमक्या दादूसवर बेफाम खुष झाल्याचे पहावयास मिळत आहे.