Navimumbailive.com@gmail.com :- ९८२००९६५७३
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : मनोज मेहेर आणि सारसोळे गाव हे गेल्या १५ वर्षापासून नवी मुंबईच्या सारीपाटावर जोडले गेलेले सर्वपरिचित असे नाव. सारसोळे गावच्या व ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पायाला भिंगरी लावून परिश्रम करणारे एक नाव. लोकनेते गणेश नाईकांचा जनता दरबार, सिडको, महापालिका, पालिका विभाग अधिकारी कार्यालय, पोलिस मुख्यालय, कांदळवन व वनविभागाचे ऐरोली व मुंबईतील कार्यालय, मंत्रालय आदी ठिकाणी सारसोळे गावाच्या विकासासाठी पाठपुरावा करणारे एकमेव गाव. नवी मुंबई कार्यक्षेत्रातील दिघा ते बेलापुरदऱम्यान सारसोळे गावचा उल्लेख निघाल्यास सर्वप्रथम मनोज मेहेर हे नाव चर्चेला येते. अर्थात त्यासाठी मनोज मेहेर यांचे सारसोळे गावासाठी मनोज मेहेर यांचे गेल्या १५ वर्षातील परिश्रम नवी मुंबईकरांनी जवळून पाहिले आहे आणि अनुभवलेही आहे.
सध्या निवडणूकीचा काळ आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रत्येक जण आपले महापालिका निवडणूकीतील फायनल करण्यासाठी आपल्या पायाचे तळवे झिजवित आहे. त्याचवेळी प्रभाग ८६ मधून सारसोळेचे ग्रामस्थ व नेरूळ सेक्टर सहाचे रहीवाशी ज्या नावाची नगरसेवक म्हणून आतुरतेने वाट पाहत आहे, तो मनोज मेहेर मात्र पाच-सहा दिवसापूर्वी सारसोळे जेटीवर जाणाऱ्या नळाची दोन दिवस नाल्यात उभा राहून दुरुस्ती करून घेत होता. मासेमारी करून येणाऱ्या सारसोळे ग्रामस्थांनी चिखलाचे व गाळाचे पाय घेवून गावात लांबवर जावू नये, त्याने जेटीवरच हातपाय स्वच्छ धूवून गावात जावे यासाठी नाल्याच्या दुर्गंधीत मनोज मेहेर दोन दिवस उभा होता. हे दृश्य पामबीच मार्गावरून महापालिकेत जाणाऱ्या अनेक पत्रकारांनीही जवळून पाहिले.
आज सकाळी ऐरोलीतील महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग कार्यालयात जावून मनोज मेहेर यांनी तेथील अधिकाऱ्यांशी वनविभाग, कांदळवनाच्या माध्यमातून सारसोळे ग्रामस्थांना रोजगार व उद्योगाच्या संधी कशा प्राप्त होतील, मासे, खेकडे व इतर व्यवसाय, त्यामागील प्रक्रिया, मंत्रालयीन अनुदान, कर्ज याबाबत विस्तृत माहिती घेतील. याबाबत मंत्रालयात कोणाशी पाठपुरावा करायचा याची माहिती जाणून घेतली. ऐरोलीतील काही पत्रकार मित्रांच्या माध्यमातून मनोज मेहेर यांनी मंत्रालयातील पत्रकारांशी संपर्क करून संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केला. सारसोळे गावची परिस्थिती कथन केली. महाशिवरात्रीनंतर बामनदेवाचा भंडारा झाल्यावर मंत्रालयात येवून प्रत्यक्ष अधिक माहिती जाणून घेवू व पाठपुरावा करू असे मनोज मेहेर यांनी मंत्रालयातील पत्रकारांना व अधिकाऱ्यांना सांगितले.
एकीकडे खाडीअंर्तगत भागात बामणदेव भंडाऱ्याची तयारी, निमत्रंण पत्रिका वाटपाची घाई व त्यातही सारसोळे ग्रामस्थांसाठी करावी लागणारी धावपळ यामध्ये व्यस्त असणारा मनोज मेहेर सारसोळेच्या ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर सहाच्या रहिवाशांना जवळून पहावयास मिळत आहे.