नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६ ए येथे महानगरपालिकेची वत्सलाबाई रामा भगत ही शाळेच्या मागील बाजूस असलेला गर्दुल्याचा वाढता वावर आणि दारूच्या बाटल्यांचा बाराही महिने पडलेला खच या पार्श्वभूमीवर प्रभाग ९६च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत व गणेशदादा भगत यांनी नेरूळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना लेखी निवेदन देवून साकडे घातले आहे.
या शाळेच्या मागील बाजूस मातीचे ढिगारे तसेच अन्य कचरा पडलेला आहे. दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. या ठिकाणी गर्दुल्यांचा वावर बाराही महिने दिसून येत आहे. या शाळेच्या मागील बाजूस असलेला बकालपणा,, दारूच्या बाटल्यांचा पसारा, गर्दुल्यांचा वाढता वावर परिसराला भूषणावह नाही. शाळेच्या जवळपास व मागील बाजूस खुलेआमपणे गर्दुले नशापाणी करत असल्याने विद्यार्थ्याच्या तसेच पालकांच्या आणि स्थानिक रहीवाशांच्या जिविताला धोका निर्माण झालेला आहे. आपण या ठिकाणी पोलीस गस्त वाढवून गर्दुल्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी गणेशदादा भगत व नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी केली आहे.
प्रभागात पोलीस चौकी व्हावी आणि गस्त वाढवावी तसेच परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करावी यासाठी नगरसेविका रूपाली किसमत यांनी पालिका प्रशासन व पोलिस आयु्क्तांकडे सतत पाठपुरावा केला आहे. पामबीच मार्गला समांतर असणाऱ्या सर्व्हिस रोडवरही सुरक्षा वाढवावी याबाबतही पाठपुरावा केलेला आहे.