नवी मुंबई : राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या निमित्ताने २८ फेब्रुवारी रोजी संस्थेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष नामदेव भगत यांनी केले. या प्रदर्शनात इंग्रजी विभाग व मराठी प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयावर व विज्ञानावर आधारित प्रयोग करून त्याचे सादरीकरण केले. या प्रदर्शनात सौरऊर्जा, जलसंर्वधन, खेळातून विज्ञान, ज्वालामुखी, संतुलित आहार, हवेचा दाब, पाणी, सिंचन यासारख्या अनेक विषयाचे प्रयोग सादर केले. या प्रयोगाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे पुरस्कारप्राप्त अशा जैवइंधन या विषयाचा प्रयोग येथे पहायला मिळाला.
कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहूण्यांनी मुलांना विज्ञान व दैनंदिन जीवनाची योग्य सांगड कशी घालायची यावर मार्गदर्शन केले. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञान या विषयावर आपली भाषणे सादर केली. प्रमुख पाहूण्यांनी या प्रदर्शनातील सहभागी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. सौ. पायल खरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका व शिक्षकवृंद यांनी सहभाग घेतला होता.