कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी केंद्राच्या मदतीसाठी आमदार मंदाताई म्हात्रेंचा पुढाकार
अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या सामाजिक संवेदना असलेल्या अशी त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. स्पष्टवक्त्या व रोखठोक विचारसरणी असणाऱ्या आमदार सौ. आमदार मंदाताई म्हात्रे या देशावर अथवा राज्यावर नैसर्गिक अथवा अन्य आपत्ती आल्यास नेहमीच पुढाकार घेत असतात. कोरोनाविरोधात देश लढा देत असताना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आपले एक महिन्याचे वेतन पंतप्रधान निधीला देण्याचे जाहिर केले आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी केंद्राच्या मदतीसाठी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी कृतीतून पुढाकार घेतला आहे.
काही महिन्यापूर्वीच अवकाळी पाऊस, संततधार पाऊस व ओला दुष्काळ यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागच्या तोंडचे पाणी पळाले होते. त्यावेळी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील मुलांवर संकट कोसळले होते. घरच्या लोकांशी भ्रमणध्वनीवरही संपर्क साधणे अवघड होवून बसले होते. अशा वेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने निधी संकलित केला व त्यात आपल्या पैशाची भर टाकत त्या विद्यार्थ्यांना सहा ते सात लाख रूपयांची औरंगाबादला जावून मदत केली होती.
कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी लोकांच्या भेटीगाठी घेत, तसेच सोशल मिडियावरून या रोगाचे गांभीर्य नवी मुंबईकरांच्या निदर्शनास आणून देत आहे. मार्गदर्शन करत आहे. पंतप्रधान मोदींनी देश लॉकआऊटची घोषणा करताच अनेक समाजसेवक सोशल मिडियावर कार्यरत होताच आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या बेलापुर मतदारसंघातले ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, किराणा मालाची दुकाने, एपीएमसीतील व्यापारी सर्वाशी संपर्क करत आहेत. कोठेही मालाचा तुटवडा पडणार नाही याची काळजी घेत आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या घरात कोणी नसेल तर त्यांना घरपोच किराणा माल पोहोचविण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे कार्यरत झाल्या आहेत. भुकंप असो पुर सतत मदतीत पुढाकार घेणाऱ्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आता कोरोनाविरोधातील लढाईतही सक्रिय झाल्या आहेत. अन्य राजकारण्यांप्रमाणे त्या केवळ वाचाळवीर न राहता त्यांनी योगदान देण्यासही सुरूवात केली आहे.