अॅड . महेश जाधव : स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : विविध राज्यांत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्याचा निर्णय केंद्र सरकार ने घेतला तेंव्हा त्यांच्या प्रवास खर्चाची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपविण्यात आलेली होती.मजुरांकडून कोणत्याही स्वरूपात पैसे घेण्याचा निर्णय झाला नव्हता.त्याप्रमाणे आता मजुरांचा ८५ टक्के प्रवासखर्च रेल्वे स्वतः करणार असून १५ टक्के खर्च राज्य सरकार ने करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार देशभरात मजूरांना त्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कॉंग्रेस ने मजुरांचा प्रवास खर्च करू नये त्यापेक्षा मजुरांना अन्नधान्य भोजन देण्याचा खर्च काँग्रेस ने करावा अशी जाहीर सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार मजुरांच्या पाठीशी उभे आहे. मजुरांचा मोदी सरकारवर विश्वास आहे. गरिबांचा विश्वास जिंकलेले मोदी सरकार आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मजुरांच्या तिकिटाचे पैसे खर्च करण्याची गरज नाही. खर्च पैसे करायचे असतील तर त्या पैशातून त्यांनी मजुरांना अन्नपाणी भोजन द्यावे असे आवाहन रामदास आठवले यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना केले आहे.