• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 5, 2020

चाकरमान्यांना त्यांच्या मुळ गावी मोफत पाठवण्याची व्यवस्था करा : आशिष शेलार

adminbyadmin
in Uncategorized
0
हजारोंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : आशिष शेलार

अॅड . महेश जाधव : स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : परराज्यातील मजूर आणि कामगांराना त्यांच्या राज्यात परत पाठवत असतानाच आपल्या महाराष्ट्रातून मुंबई, पुणे सारख्या शहरामध्ये कामा निमित्त आलेल्यांवर मात्र अन्याय करीत आहोत.  विदर्भ, कोकण, मराठवाडा, खांदेश, पश्चिम महाराष्ट्रातील  विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्टयातील तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्हयातील श्रमिक, चाकरमान्यांना त्यांच्या मुळ गावी मोफत पाठवण्याची व्यवस्था करा, अशी विनंती भाजपा नेते आमदार  आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
आमदार आशिष शेलार यांनी
 पत्रात म्हटले आहे की, आपण राज्य शासनातर्फे परराज्यातील मजूर व कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याचे नियोजन करीत आहात. त्यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी गर्दी करून आरोग्याची काळजी घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. त्याकडे वेळीच शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. ४ मे रोजी भाभा रुग्णालय येथे मजुरांनी केलेल्या गर्दीने आरोग्याचे नियम पाळण्यात आले नाहीत.
राज्यात जिलह्याच्या सिमा बंद करण्यात आल्यामुळे राज्याअतंर्गत अनेक श्रमिक, कामगार अडकून पडले आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे आरोग्य तपासणी करून अशा श्रमिकांना तातडीने त्यांच्या मुळ गावी सोडल्यास त्यांची होणारी कुजंबणा व गैरसाय कमी होईल. यातील अनेक श्रमिक, मजूर हे जिल्ह्यांच्या सिमांवर अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या अन्न पाण्याच्या सुविधेसह आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच परराज्यातील मजूर आणि कामगांराना त्यांच्या राज्यात परत पाठवत असताना आपल्या महाराष्ट्रातून मुंबई, पुणे सारख्या शहरामध्ये कामा निमित्त आलेल्यांवर मात्र अन्याय करीत आहोत. आपल्या विदर्भ, कोकण, मराठवाडा, खांदेश, पश्चिम महाराष्ट्रातील
  विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्टयातील तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्हयातील चाकरमानी मोठया प्रमाणात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या परिसरात कामानिमित्त आलेले अनेक चाकरमानी अडून पडले आहेत.
यातील बहूसंख्य जण छोट्या छोट्या खोल्यांमध्ये दाटीवाटीने राहत असून त्यांना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. याच वर्गाने आजपर्यंत मुंबईतील गिरणी कामगारांपासून अनेक महत्वाच्या उद्योग व्यवसायात व मुंबईच्या आर्थिक विकासात मोठा वाटा निभावला आहे. त्यामुळे शासनाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र व अन्य भागातून मुंबईत आलेल्या चाकरमान्यांना त्यांच्या मुळ गावी मोफत पाठविण्याची व्यवस्था तातडीने करावी. तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना त्यांच्या गावी कोरंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून कोरोनाचा
  फैलाव ही रोखता येईल असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

Previous Post

कोरोनाचे सामाजिक भान जपणारा प्रसिध्दी विभागातील योध्दा प्रफुल्ल!

Next Post

मजुरांचा प्रवासखर्च न करता काँग्रेसने मजुरांना अन्नधान्य द्यावे : रामदास आठवले

Next Post
कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा  निर्णय योग्य

मजुरांचा प्रवासखर्च न करता काँग्रेसने मजुरांना अन्नधान्य द्यावे : रामदास आठवले

आमदार मंदाताई म्हात्रेंकडून पंतप्रधान निधीला एक महिन्याचे वेतन

कोरोना टेस्टींग केंद्र व लॅब उभारणीकरिता ५० लाखाचा आमदार निधी घ्या : सौ. मंदाताई म्हात्रे

शशिकांत शिंदेंच्या विधान परिषदेसाठी समर्थकांकडून सोशल मिडियावर जोरदार लॉबिंग सुरू

शशिकांत शिंदेंच्या विधान परिषदेसाठी समर्थकांकडून सोशल मिडियावर जोरदार लॉबिंग सुरू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com