अॅड . महेश जाधव : स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : नवी मुंबईतील बेलापुर विधानसभा कार्यक्षेत्रात कोरोना टेस्टींग व लॅब उभारण्याकरिता आमदार निधीतून ५० लाख रूपये घेण्याच्या लेखी सूचना बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसापासून नवी मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहे. महापालिकेत अथवा खासगी रूग्णालयात कोरोनाची चाचणी केल्यास मुंबईतील जेजे अथवा हाफकिन रूग्णालयातून येणाऱ्या अहवालावर अवलंबून राहावे लागते. अहवाल येण्यास ८ दिवसाचा कालावधी लागतो. समस्येचे गांभीर्य पाहता कोरोना टेस्टींग केंद्र व लॅब नवी मुंबईत झाल्यास अहवालाचा विलंब टळेल व कोरोना रूग्णांचे निदान लवकर होवून रूग्णांची संख्या आटोक्यात येण्यास मदत होईल. यासाठी टेस्टींग केंद्र व लॅब आता नवी मुंबईतच असणे आवश्यक आहे. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता आपण आमदार निधीतून ५० लाख घेवून बेलापुर विधानसभा कार्यक्षेत्रात हे निर्माण करण्याच्या सूचना भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिल्या आहेत.