मुंबई : रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी उपनगरीय रेल्वेची संख्या ३५० ने वाढविल्यान आता उपनगरीय रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली दिसून येणार आहे.
आतापर्यत केवळ लॉकडाऊननंतर उपनगरीय रेल्वेमध्ये केवळ पालिका कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी व अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच उपनगरिय रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा होती. २९ जून रोजी केंद्र सरकार आणि वेगवेगळी कार्यालये-आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक यामधील कर्मचाऱ्यांना लोकलचा प्रवास करता येत नाही. त्यामुळे अशी कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला करण्यात आली आहे. राज्याच्या या मागणीला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून उपनगरीय रेल्वेच्या संख्येत वाढ केल्याची घोषणाही रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केले असून त्याबाबत त्यांनी ट्विटही केले आहे. आता उपनगरीय रेल्वेतून बॅक कर्मचारी, पोष्ट कर्मचारी, आयकर विभाग कर्मचारी, संरक्षण विभागाचे तसेच राज भवनचे कर्मचारी आणि केंद्र सरकारच्या इतरही विभागातील कर्मचाऱ्यांना आता उपनगरीय रेल्वेने प्रवास करणे शक्य होणार आहे.