• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 18, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 30, 2020

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ५ दिवसाचा आठवडा

adminbyadmin
in Uncategorized
0
शिवसेनेची भूमिका सत्ता संपादनात ठरणार महत्वाची

मुंबई  : केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनाने २४ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करून सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस ठरवण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर येत्या ४ जुलै पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला असल्याची माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय  देखील निर्गमित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील ज्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा पाणीपुरवठा केंद्रावरील नियमित आस्थापना, रूपांतरित स्थायी,अस्थायी आस्थापना ,कार्यव्ययी आस्थापना,रोजंदारीवरील आस्थापना, सफाई कामगार यांना हा आदेश लागू राहणार नाही.

शासनाच्या नगरविकास विभागाने  २१ जानेवारी १९८४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरी सेवा नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २३ मार्च २०१७ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम व शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय लागू करण्यात आले आहेत.त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील यांचेकडे केली होती. या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करून विभागाने व शासनाने ही मागणी मान्य केली व कर्मचारी हिताचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री  पाटील यांनी सांगितले.

या निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सर्व कार्यालयांची कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी वाढवण्यात आली असून येत्या ४ जुलैपासुन कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत राहणार आहे. दुपारी १ ते २ च्या दरम्यान अर्ध्या तासासाठी भोजनाची सुट्टी देण्यात येणार आहे. कार्यालयातील शिपायांसाठी सकाळी ९.३० ते  सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत कामकाजाची वेळ ठरविण्यात आली आहे.

Previous Post

पंतप्रधानांच्या संबोधनातून गरीब जनतेचा अपेक्षा भंगः बाळासाहेब थोरात

Next Post

मराठीचा वापर करा अन्यथा वेतनवाढ संकटात!

Next Post
शासकीय कर्मचाऱ्यांनो आता अर्ध्या तासातच जेवण उरका

मराठीचा वापर करा अन्यथा वेतनवाढ संकटात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

प्रभाग ८६ मध्ये तुर्भे पॅटर्न राबवा : मनोज मेहेर

९६ तासात धान्य न मिळाल्यास एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचा गणेश भगतांचा इशारा

९६ तासात धान्य न मिळाल्यास एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचा गणेश भगतांचा इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com