
सुजित शिंदे
नवी मुंबई : स्वच्छ स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२० मध्ये नवी मुंबई शहराला देशात तिसरा व राज्यात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना शाखा क्रं ८६ कडून परिसरातील सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.
शिवसेना शिव वाहतूकसेनेचे नवी मुंबईप्रमुख व शिवसेना शाखा क्रमांक ८६ चे शाखाप्रमुख दिलिप आमले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बुधवारी (दि. २६) सकाळी १० वाजता विभागातील सर्व महिला तसेच पुरूष सफाई कामगारांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख प्रल्हाद पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका पश्चिमचे अध्यक्ष महादेव पवार, शिवसेना शाखाप्रमुख मनोज तांडेल, शाखाप्रमुख इमरान नाईक, शाखाप्रमुख तुलसी कनोजिया, रवी पवार, रोहिदास हाडवळे, बाळासाहेब नाईकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साफसफाई कामगार सत्यवान कालण, सत्यवान म्हात्रे, दिनेश टिळक, चंद्रकांत गवारे, बाळु लोखडे तसेच महिला कामगार सौ लिलाबाई घुगे यांचा शाल, श्रीफळ, आर्सेनिक अल्बम ३० व मास्क देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले यांनी विभागातील सर्व कामगारांच्या कामगिरी बद्दल समाधान व्यक्त केले.