
नवी मुंबई : लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपचे माजी नगरसेवक सुरज बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील, माजी नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर यांच्या वतीने कोरोना महामारीच्या संकटात योगदान देणाऱ्या डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आशा कामगार, रुग्णवाहीका चालक यांचा कोव्हीड सैन्याप्रति कृतज्ञता म्हणून सत्कार आणि आभार कार्यक्रमाचे आयोजन कुकशेत गावातील दिवंगत नगरसेवक रामचंद्र लक्ष्मण पाटील नागरी आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी अविरत चालु असलेल्या सेवेकरीता व योगदानाकरिता सर्व आरोग्य कर्मचारी वर्गाचे नागरीकांच्या वतीने आभार मानले.
या कार्यक्रमात नागरी आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. अशोक जाधव यांच्या समवेत ४० आरोग्य कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रभाग क्रमांक ८५ च्या माजी नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील, प्रभाग क्रमांक ८६ च्या माजी नगरसेविका सौ. जयश्री ठाकुर, सचिन पाटील, सुचिता पाटील, अलंका ठाकुर , स्वाती पाटील, जया कातकरी, कमलाबाई ठाकुर , राधिकाबाई ठाकुर, कविता गोताड, श्रेया चौधरी व इतर सहकारी उपस्थित होते.
तसेच प्रभाग क्रमांक ८५ आणि ८६ मधील १०वी आणि १२वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रभागातील विद्यार्थ्यांचा सत्कार प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जावून करण्यात येणार आहे असे पाटील यांनी सांगितले.