
निलेश बाणखिलेंसह मनसैनिकांचा घोषणाबाजीच्या गजरात रबाळे ते कोपरखैरणे रेल्वे प्रवास
नवी मुंबई : जनजीवन सुरळीत करण्यासाठी यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी यासाठी मनसेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बाणखिलेंसह मनसैनिकांनी रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून सविनय कायदेभंग आंदोलन केले. निलेश बाणखिलेंसह मनसैनिकांचा घोषणाबाजीच्या गजरात रबाळे ते कोपरखैरणे रेल्वे प्रवास केला. रबाळे पोलिसांनी या मनसैनिकांना अटक केली खरी, पण काही वेळाने पोलिसांनी या मनसैनिकांची सुटका केली. नवी मुंबई शहरात निलेश बाणखिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या रेल्वे प्रवासाचीच चर्चा सुरू होती.
मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून उतरली. मनसेचे संदीप देशपांडे, गजानन काळे मुंबईत रेल्वे प्रवास करत असताना नवी मुंबईतील मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी सविनय कायदेभंग आंदोलन करत सोमवारी सकाळी रबाळे ते कोपरखैरणे रेल्वे प्रवास करताना नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली. या निलेश बाणखिले व त्यांच्या सहकारी मनसैनिकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रबाळे रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मुंबईत केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठीच लोकलच्या प्रवासाची मुभा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्याने बस आणि एसटी वाहतुकीवर कमालीचा ताण पडत आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून या पार्श्वभूमीवर मनसेच्या संदीप देशपांडेंनी मुंबईत व गजानन काळे यांनी नवी मुंबईतून सर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी म्हणून सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी रबाळे रेल्वे स्थानकात जाऊन घोषणाबाजी करत ट्रान्स हार्बर मार्गावरील रबाले ते कोपरखैराणे असा रेल्वे प्रवास करून नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी केली आहे.
यावेळी सविनय कायदेभंग आंदोलनाविषयी माहिती देताना नवी मुंबईतील मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सर्व सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, त्यांना रोजगार उरला नाही. कामावर जाण्याकरिता प्रवाशांना बसच्या प्रचंड गर्दीतून आठ तास प्रवास करावा लागत आहे. बस आणि एसटीतील या गर्दीमुळे कोरोना होत नाही का? बसमधून कोरोना होत नाही आणि रेल्वेने प्रवास केला तर कोरोना होतो? असा खोचक प्रश्न विचारात सामान्य माणसाला रेल्वेचा प्रवास सुरळीत करून देण्याची विनंतीसुद्धा बाणखेले यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे. यावेळी निलेश बाणखेले यांना व त्यांच्या सहकारी मनसैनिकांना रबाळे पोलिसांनी अटक करून काही वेळाने सोडून दिले.