
नवी मुंबई : संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व नेरूळ पश्चिमेला सुहासिनी नायडू यांचा वाढदिवस विविध लोकोपयोगी उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. भाजपा युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी पंतप्रधानांच्या व स्वतःच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. १७ सप्टेंबर रोजी महापालिका सफाई कर्मचारी,अतिक्रमण कर्मचारी, आरोग्य विभागातील फवारणी कर्मचारी तसेच गटार काम करणारे कामगार यांचे सत्कार हे सन्मान प्रमाणपत्र व तांदूळ, तेल व फळ वाटप करण्यात आले. १८ सप्टेंबर सुहासिनी नायडू यांचे वाढदिवसा निमित्ताने प्रभागात नागरिकांना तांदूळ, ५० लिटर तेल व भाज्यांचे वाटप करण्यात आले. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटण्यात आल्या. यासोबत प्रभागातील २० स्थानिकांचा दुचाकी अपघाती विमा काढून देण्यात आला. यावेळी वृक्षारोपण करून विविध ठिकाणी रोपे लावण्यात आली. येत्या काळात पर्यावरण जपण्याच्या दृष्टीने त्यांची निगा देखील राखली जाणार आहे. कोविडमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसॊबत विविध कामाद्वारे स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांमध्ये जनजागृती करणारे पालिका कर्मचारी, कोविड काळात काम करणारे योद्धांचे सत्कार करण्यात आल्याचे भारतीय जनता युवा मोर्चा युवती अध्यक्ष सुहासिनी रमेश नायडू यांनी सांगितले