• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 22, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 21, 2020

लोकनेते गणेश नाईकांच्या पाठपुराव्यामुळे पालिका प्रशासन देणार अनेक कामांना गती

adminbyadmin
in Uncategorized
0
कोव्हिड सेंटरमध्ये तज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक : लोकनेते गणेश नाईक

स्वयंम न्यूज ब्युरो : 9820096573

1) महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप
2) प्रथम संदर्भ रूग्णालय 28 सप्टेंबरपासून सर्व आजारांच्या उपचारासाठी खुले
3) महापालिका शाळांतही उपलब्ध होणार ऑनलाईन शिक्षणाची सुविधा
4) डीवायपाटील रूग्णालयात व्हेंटीलेटरची संख्या वाढविणार

नवी मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी मागील तीन महिने महापालिका आयुक्तांंबरोबर प्रत्येक आठवड्याला आढावा बैठका ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, ऐरोलीचे आमदार लोकनेते गणेश नाईक घेत आहेत. या बैठकांची फलनिष्पत्ती म्हणजे अनेक महत्त्वाचे निर्णय गणेश नाईकांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून मान्य करुन घेतले आहेत. 21 सटेंबर रोजी महापालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीमध्ये महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची त्यांनी केलेली मागणीदेखील महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मान्य केली आहे.
खाजगी शाळांच्या तुलनेमध्ये महापालिका शाळा मागे पडू नयेत यासाठी या शाळांमधून ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्याची मागणीदेखील मंजूर करुन घेत आमदार गणेश नाईक हे पालिका प्रशासन दरबारी दीर्घकाळ प्रयत्न करीत असलेले वाशीतील महापालिकेचे प्रथम संदर्भ रुग्णालय केोरोना मुक्त करण्याची आणखी एक मागणी पूर्णत्वास गेली आहे. त्यानुसार येत्या 28 सटेंबरपासून हे प्रथम संदर्भ रुग्णालय सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचारासाठी खुले करण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जास्तीत जास्त ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याची सूचना आ. गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार 435 पर्यंत ऑक्सिजन बेडस्‌ उपलब्ध करून देण्याची योजना महापालिकेने आखली असून सध्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपलब्ध 80 व्हेंटिलेटरची संख्यादेखील वाढविण्यात येणार आहे. आरोग्यानंतर शिक्षण महत्वाची बाब असून महापालिका शाळांमधून ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत उदासिनता दिसून येत असल्याचा मुद्दा ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी सदर बैठकीत मांडला. खाजगी शाळांमध्ये युनिट टेस्टपर्यंत ऑनलाईन शिक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, महापालिका शाळा त्यादृष्टीने मागे पडल्या आहेत. त्यामुळे आवश्‍यक ॲपची निर्मिती करुन त्यादृष्टीने शिक्षकांंनाही प्रशिक्षण द्यावे, असे नवी मुंबईचे विकासपर्व संदीप नाईक यांनी नमूद व्ोले. कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारने नागरिकांंसाठी आत्मनिर्भर योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ नवी मुंबईकर नागरिकांंना करुन देण्यासाठी महापालिकेने यंत्रणा उभी करावी. तसेच केोरोना नियंत्रणासाठी नियमानुसार जेवढा खर्च करायचा आहे, तेवढा खर्च महापालिकेने करावा. महापालिका हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवा. महापालिकेचे मयत वोरोना योध्दे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कुटुंबियांना अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन तरतूद केलेला मदतनिधी तात्काळ दिला पाहिजे. कंत्राटी अधिकारी-कर्मचारी यांचे थकीत वेतन विनाविलंब देण्यात यावे. महापालिकेने स्वत: ऑक्सिजन निर्मिती युनिट सुरु करावे, अथवा एमआयडीसी भागातील बंद पडलेले ऑक्सिजन निर्मितीचे कारखाने स्वत: सुरु करावेत, अशा अन्य महत्त्वपूर्ण सूचना देखील आमदार गणेश नाईक यांनी यावेळी केल्या. यावेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबईचे विकासपर्व व ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, सागर नाईक, सुधावर सोनवणे, माजी नगरसेवक अनंत सुतार, नवीन गवते, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, सुरज पाटील, अशोक गुरखे, गिरीश म्हात्रे, प्रदीप गवस, निशांत भगत, लक्ष्मीकांत पाटील, विशाल डोळस, राजश्री कातवरी, सुनिल कुरकुटेे आदी उपस्थित होते.

Previous Post

भाजपा युवती नवी मुंबई अध्यक्षा सुहासिनी नायडूंचा वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post

थकबाकी न मिळाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करणार : मंगेश लाड

Next Post
थकबाकी न मिळाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करणार : मंगेश लाड

थकबाकी न मिळाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करणार : मंगेश लाड

जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा : सचिन सावंत

शेतकरी आत्महत्या लपवण्याची दिक्षा मोदींकडूनच इतर राज्यात : सचिन सावंत

नेरूळ सेक्टर २ एलआयजी वसाहतीत कॉंग्रेसचे मास्क वाटप

नेरूळ सेक्टर २ एलआयजी वसाहतीत कॉंग्रेसचे मास्क वाटप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com