
नवी मुंबई : नेरुळ विभागातील नागरिकांकरिता जनसेवक गणेशदादा भगत आणि स्थानिक मा. नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांच्या वतीने ५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ नोंदणी शिबिर घेण्यात आले होते, त्यावेळी ८८१ नागरिकांनी नोंदणी केली होती.
ही योजना केंद्र सरकारची महत्वाकांक्षी लोकल्याणकारी योजना आहे. या योजनेचे २३ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले होते. या योजनेंतर्गत १० कोटींहून अधिक कुटुंबांना ५ लाखांपर्यंतचे आरोग्य विमा कवच मिळणार आहे.
नोंदणी केलेल्या नागरिकांना २७ सप्टेंबर २०२० रोजी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ कार्डचे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक-९६ जनसंपर्क कार्यालय येथे वाटप करण्यात आले. याप्रसंगी समाजसेवक अनंत कदम, सुरेश बोराटे, चंद्रकांत महाजन, विकास तिकोने, अशोक गांडाल, सागर मोहिते, संतोष शिंदे, धनाजी कचरे, राजेंद्र तुरे, रविंद्र भगत उपस्थित होते.