
नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ९६, भाजपच्या वतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती शुक्रवारी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी १०:३० वाजता नेरुळ प्रभाग क्रमांक -९६ मधील सेक्टर-१६ येथील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात जनसेवक गणेशदादा भगत आणि कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे प्रेरणा स्त्रोत आणि पक्षाला विचारधारा प्रदान करणारे पंडीत दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी समाजसेवक अशोक गांडाल, सागर मोहिते, संग्राम चव्हाण, रविंद्र भगत, जयेंद्र नागरजी उपस्थित होते.