• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 22, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 1, 2020

शुक्रवारी काँग्रेसचे राज्यव्यापी ‘किसान मजदूर बचाओ’ आंदोलन

adminbyadmin
in Uncategorized
0
रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा: बाळासाहेब थोरात

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात लासलगाव येथे धऱणे आंदोलनात सहभागी होणार

Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३

मुंबई :  केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर घेतली. हा शेतकऱ्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा डाव आहे. काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्याविरोधात राज्यविरोधी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून उद्या शुक्रवार दि. २ ऑक्टोबर रोजी राज्यात शेतकरी मजूर बचाओ दिवस पाळण्यात येणार असून राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी सकाळी १० वाजल्यापासून धरणे आंदोलन करण्य़ात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे लासलगाव जि. नाशिक येथे आंदोलनात सहभागी होणार आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे बैलगाडी लाँग मार्च आयोजित करण्यात आला आहे.   माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड हे मुंबई येथे धरणे आंदोलन करणार आहेत. गुजरातचे प्रभारी खा. राजीव सातव हे हिंगोली येथे आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांच्या नेतृत्वाखाली वर्धा येथे आंदोलन करण्यात येणार आहे. नंदूरबार येथील महात्मा गांधी पुतळ्या समोर आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर येथील गांधी चौकात काळ्या कायद्याविरोधात आंदोलन करणार आहेत.  गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हे कोल्हापूर येथे आंदोलन करणार आहेत. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली मार्केट यार्ड  येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

Previous Post

राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करणे ही उत्तर प्रदेश सरकारची दडपशाहीः बाळासाहेब थोरात

Next Post

सोसायटी आवारातील कोरोना रूग्णांची माहिती सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही

Next Post
मूषक नियत्रंण कामगारांना वेळेवर वेतन द्या :  अशोक गावडे

सोसायटी आवारातील कोरोना रूग्णांची माहिती सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही

मूषक नियत्रंण कामगारांना वेळेवर वेतन द्या :  अशोक गावडे

ग्रामस्थांच्या गरजेपाटी घरांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादीचा मंत्रालयात आग्रही पाठपुरावा कायम

प्रभाग ८७ मध्ये घरटी मास स्क्रिनिंग करण्याची मागणी

नवी मुंबईत कोरोनाचे नवे ३८३ रुग्ण पॉझिटिव्ह, आजवर ७५४ मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com