
सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील मार्गफलक तातडीने बदलण्याची मागणी सारसोळे गावचे विकासपर्व म्हणून ओळखले जाणारे स्थानिक भुमीपुत्र व महापालिका ‘ब’ प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात व सारसोळे गावात रहीवाशांना व ग्रामस्थांना तसेच बाहेरून येणाऱ्या घटकांना परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांची व मार्गाची माहिती असावी म्हणून महापालिका प्रशासनाने काही वर्षापूर्वी सेक्टर सहा व सारसोळे गावातील अंर्तगत तसेच बाहेरील रस्त्यावर मार्गफलक बसविले आहेत. ते मार्गफलक आता जुनाट झाले आहेत. महापालिका प्रशासनाने सभोवतालच्या अन्य परिसरात नव्याने व सुधारीत मार्गफलक बसविले आहेत. मात्र सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरात नव्याने मार्गफलक बसविण्यात आलेले नाहीत. अनेक सुधारणात्मक गोष्टीमध्ये महापालिका प्र्रशासन नेरूळ सेक्टर 6 व सारसोळे गावाला का वगळत आहे, का कानाडोळा केला जात आहे तेच समजत नाही. आपण सभोवतालच्या सेक्टरची पाहणी करावी. तेथील मार्गफलक व सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहामधील मार्गफलक याची तपासणी करावी. सभोवतालच्या परिसरात बसविण्यात आलेल्या मार्गफलकाप्रमाणेच नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गाव परिसरात लवकरात लवकर मार्गफलक बसविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.