
स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापलिका प्रभाग ८७ मध्ये नेरूळ सेक्टर ८ राजीव गांधी उड्डाण पुल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलापर्यतच्या परिसरात रेल्वे रूळालगतची तुटलेल्या संरक्षक भिंतीची डागडूजी करण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून बुधवारी (दि. ४ नोव्हेंबर) केलीआहे.
महापालिका प्रभाग ८७ मध्ये नेरूळ सेक्टर ८ मधील राजीव गांधी उड्डाणपुलापासून ते नेरूळ सेक्टर १० मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलापर्यत असलेली रेल्वे रूळालगतची संरक्षक भिंत ठिकठिकाणी तुटलेली आहे. काही ठिकाणी भिंतीला भगदाडही पडलेले आहे. या ठिकाणी गर्दुले, अन्य व्यसनी लोकांचा वावर त्या ठिकाणी वाढलेला आहे. तुटलेल्या संरक्षक भिंतीमुळे त्या ठिकाणी वाढीस लागलेल्या समाजविघातक प्रवृत्तींकडून त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला वर्गाची छेडछाड अथवा अन्य दुर्घटना होण्याची भीती आहे. महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर त्या संरक्षक भिंतीची डागडूजी करावी, संबंधितांना तसे निर्देश द्यावेत अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.