
नवी मुंबई : दिपावली अवघ्या पाच-सहा दिवसावर आलेली असताना नेरूळ प्रभाग ९६ मध्ये माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी प्रभागामध्ये घरोघरी जावून शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आहे. नेरूळमधील अन्य राजकारणी उटणे बनविण्यात व्यस्त नेरूळ नोडमध्ये भगत परिवाराने दिवाळीच्या शुभेच्छा घरटी दिल्यामुळे त्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जावून शुभेच्छा देताना माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी साखर, रवा आणि सुंगधी उटणे दिपावली भेट दिली आहे. घरोघरी जावून दिपावलीच्या शुभेच्छा देताना रहीवाशांची आस्थेवाईक चौकशी करत भगत परिवाराने एकप्रकारे सुसंवाद अभियान सुरू केले असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी रहीवाशांना भेटी देताना माजी नगरसेविका सौ. रूपाली भगत व जनसेवक गणेश भगत यांच्यासमवेत विकास तिकोणे, सागर मोहीते, अशोक गांडाळ, राजेंद्र तुरे, विमल गांडाळ, रविंद्र भगत आदी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.