
श्रीकांत पिंगळे : संपादक : 9820096573
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनामध्ये अधिकारी, राजकारणी व राजकारण्यांशी ‘सोशल’ जवळीक साधणारे कार्यकर्ते यांच्या संगणमताने उद्यान घोटाळ्याची पोलखोल केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या प्रकाशझोताच्या शिखरावर विराजमान झाल्या आहेत. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आता सीएसआर निधीची मागणी केल्यामुळे ‘ताई’ची खेळी आता कोणाचा घेणार ‘बळी’ आणि त्यातून कोणाची भरली जाणार भ्रष्टाचाराची ‘तळी’ याची पालिका मुख्यालयात दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनला सन 2014 पासून उपलब्ध झालेल्या सीएसआर निधी आणि त्याचा केलेला वापर याची माहिती येत्या आठ दिवसात देण्याची विनंती ‘बेलापूर’च्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
नवी मुंबईसारख्या विकसित शहरामधील सार्वजनिक सेवा-सुविधा प्राप्त होण्याकरिता व्यावसायिक आणि सामाजिक जबाबदारी म्हणून
सीएसआर निधी उपलब्ध केला जातो. सन 2014 पासून नवी मुंबई महापालिकेला विविध संस्था, कंपन्या यांनी आपल्या सीएसआर फंडातून
आर्थिक मदत केलेली आहे. त्यामुळे आजतागायत महापालिकेला अशा सीएसआर फंडातून किती निधी उपलब्ध झाला आहे? तसेच या मिळालेल्या सीएसआर निधीचा वापर कोणकोणत्या बाबींसाठी करण्यात आला आहे? याबाबतची माहिती एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला द्यावी,असे पत्र बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी 6 नोव्हेंबर रोजी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले आहे.
सदर माहितीच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका प्रशासनाने मला सीएसआर निधी बाबत अहवाल दिल्यास त्याचा मला आढावा घेता येईल. त्यामुळे सदरची माहिती येत्या आठ दिवसात द्यावी, अशी विनंतीही बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना केली आहे.