
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ / ९८२००९६५७३ /Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : हिवताप विभागात डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण व रासायनिक धुरीकरण निविदा / कार्यादेशमध्ये तांत्रिक पर्यवेक्षक पद निर्माण करून संबंधित कामगारांना मस्टर (हजेरी पत्रक) वर घेण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तांत्रिक पर्यवेक्षक म्हणून आरोग्य विभागातील नागरी आरोग्य केंद्रात हिवताप विभागामध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून कार्यरत आहेत. या कामगारांकडून हिवताप विभागामध्ये डास अळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण पर्यवेक्षणाचे काम प्रभावीपणे केले जात आहे . हिवताप विभागाचे काम तांत्रिक काम असल्यामुळे तेथे तांत्रिक पर्यवेक्षक असणे बंधनकारक आहे. परंतु या सर्व तांत्रिक पर्यवेक्षकांची नेमणूक ठेकेदारामार्फत केलेली (तात्पुरत्या स्वरूपात) आहे. तांत्रिक पर्यवेक्षक हे पद पूर्वी कामगारांसमवेत मस्टर (हजेरीपत्रक) वर सन २००२ पर्यत होते. त्याबाबत मस्टरचे छायाकिंत प्रत या निवेदनासोबत रवींद्र सावंत यांनी जोडली आहे.
तांत्रिक पर्यवेक्षकांना पूर्वीप्रमाणे मस्टरवर घेण्याकरीता नवीन निविदा / कार्यादेशात तशी तरतूद करण्यात यावी की जेणेकरून या कामगारांना अनेक वर्षापासून काम करत असल्याबाबत न्याय मिळेल. या कामगारांना वेतन तुटपुंजे असून महागाईच्या काळात त्यांना आज घर चालविणे अवघड आहे. या कामगारांना समान कामाला समान न्याय यानुसार वेतन देण्याची कार्यवाही सर्वप्रथम होणे आवश्यक असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
हिवताप विभागाच्या नवीन येणाऱ्या निविदा / कार्यादेशामध्ये तांत्रिक पर्यवेक्षक पद हे ठेकेदारांमार्फत न करता डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे पालिकेच्या मस्टरवर घेवून या पर्यवेक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.