
संदीप खांडगेपाटील / ८३६९९२४६४६/९८२००९६५७३/ Navimumbailive.com@gmail.com
सार्वजनिक आरोग्य
मंत्री राजेश टोपे यांचे आयुक्तांना निर्देश
पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना
दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान द्यावे अशी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी
कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.
यावेळी मुलाणी म्हणाले की, पनवेल महानगरपालिकेमधील
अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान मिळाला नाही, असे समजते. पण, कंत्राटी
कर्मचारी हा कायम कर्मचारी इतकेच किंबहुना त्याहून थोडे अधिकचे काम करत असतो. ही वस्तूस्थिती
आहे. त्यातल्या त्यात कोविड – १९ कोरोना विषाणूच्या महामारीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी
आपल्या जीवाची पर्वा न करता अधिकचे काम केले आहे. त्यात सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत
येणाऱ्या कंत्राटी कर्मचारी – नर्स, डॉक्टर, आशा वर्कर्स आदी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या
माझे कुटुंब, माझी जवाबदारी या महिमेत जोरदार पणे काम केले आहे. त्या अनुषंगाने कंत्राटी
कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान मिळणे आवश्यक असून त्याच बरोबर कोविड भत्ता देखील
मिळाला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन
सचिव शाहरुख मुलाणी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली असता आयुक्त पनवेल महानगरपालिका यांना कंत्राटी
कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान द्यावे असे निर्देश दिले आहेत.
त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून महानगरपालिका काय कार्यवाही
करते ते पाहणे औचित्याचे ठरणार आहे. तसेच या बाबतीत पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर
व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही सदरहू निवेदन देण्यात आले असल्याची माहिती महासंघाने
दिली आहे. त्या अनुषंगाने कोणताही कंत्राटी कर्मचारी सानुग्रह अनुदानापासून वंचित राहणार
नाही याची दक्षता घ्यावी असे मुलाणी म्हणाले.