
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील कोट्यवधींची सरकारी जमीन हडप करणाऱ्या नवी मुंबई मधील सनी होम्स ली. व शेतकऱ्यांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात भा.द .वि कलाम ४२० ,४६५ ,४६६,४६८ ,४७१ ,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील अंदाजित बाजारमूल्य २० कोटी असलेली महाराष्ट्र शासनाची जमीन शेतकऱ्यांना हाताशी घेऊन पनवेल तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडप करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडीस आले आहे. विशेष म्हणजे बनावट कागद पात्रांच्या आधारे या सरकारी जमिनीचा विक्री व्यवहार करण्यासाठी कुळ कायदयानुसार अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून परवानगीही मिळवल्याचे उघडकीस आले आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी सरकारी जमीन हडप करणारे ९ बनावट वारसदार व सदर जमिनीची विक्री परवानगी मिळविणारे सनी हौसिंग इंडिया प्रा.ली या कंपनीचे संचालक सनी मानमफॉन, शेरली मानमफॉन यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात फसवणुकीसह बनावटगिरी करून सरकारी जमीन हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पनवेल मधील सर्व्हे नंबर ७०९/१ या जमीनीची महसूल अधिकार अभिलेखात महाराष्ट्र शासन पाणी जाण्याचा मार्ग (ओढा ) अशी नोंद असताना या टोळीने तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी संगनमत करून सदर सरकारी जमिनीच्या सातबारामध्ये २२ सप्टेंबर २०१४ रोजी फेरफार करून सदरची जमीन मृत गणपत माया भगत याची असल्याचे तसेच त्याचे ९ जण वारसदार असल्याची नोंद करून घेतली त्यानंतर या जमिनीचे बनावट वारसदार झालेल्या नऊ व्यक्तीना सदरची जमीन विकण्यासाठी कुल कायदा कलम ६३ नुसार विक्री परवानगी मिळावी यासाठी रायगड अपर जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज दाखल केला. त्यानुसार अपर जिल्हाधिकायांनी देखील उपलब्ध कागद पत्रावरून महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम मधील तरतुदीनुसार मे.सनी हाऊसिंग प्रा.ली. या कंपनीला निवासी व बिनशेतीसाठी ,विक्री करण्यास परवानगी दिली होती
मात्र सदर सरकारी जमीन महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बनावट कागद पत्राच्या आधारे या टोळीने स्वतःच्या नावावर केल्याबाबतची तक्रार महसूल विभागात प्राप्त झाली होती त्यानुसार महसूल विभागाने सदर प्रकरणाच्या कागद पत्राची तपासणी केली असता २०१४ पूर्वीच्या सरकारी दस्तऐवज चे संगणीकरण नोंद करण्यात आल्यामुळे संगणकात त्या अभिलेखामध्ये सदर जमीन हि सरकारी असल्याचे उघड झाले . रायगड च्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी जमीन हडप करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ९ बनावट वारसदारांना कुळ कायदा कलम ६३ नुसार जमीन विक्रीसाठी दिलेली परवानगी १५ जानेवारी २०२० रोजी रद्द केली तसेच सरकारी जमीन हडप करण्याच्या उद्देशाने अभिलेखात फेरफार करून सरकारी जमीन हडप करण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांविरोधात फोजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पनवेलचे तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी संदीप रोडे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली
पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणात मृत गणपत माया भगत याचे वारसदार असलेले रामचंद्र भगत ,पांडुरंग भगत,भास्कर भगत,भागीबाई पाटील, शोभा तांबडे, देवकी भगत, मिलींद भगत ,मनीषा खानावकर ,अपर्णा म्हात्रे या ९ जणांवर तसेच त्याच्याकडून कुळ कायदा कलम ६३ नुसार सरकारी जमिनीची विक्री परवानगी मिळविणारे मे.सनी हौसिंग प्रा.ली. कंपनीचे संचालक सनी मानमफॉन ,शेरली मानमफॉन व त्याच्या कंपनीचे प्रतिनिधी हेमंत उगले अशा एकूण ११ जणांवर फसवणुकीसह बनावट कागद पत्रे तयार करून सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणात सरकारी जमिनीचे बनावट अभिलेख तयार करण्यामध्ये पनवेल तहसील कार्यालयांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे अपर जिल्हाधिकायांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची पनवेलच्या उपविभागीय अधिकायांमार्फत चौकशी करण्याचे व या चौकशीत दोषी आढळल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत .