• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, February 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 12, 2020

कोरोनाचा धोका अजून पूर्णतः टळलेला नाही : पालकमंत्री छगन भुजबळ

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोनाचा धोका अजून पूर्णतः टळलेला नाही : पालकमंत्री छगन भुजबळ

दिवाळीचा सण साजरा करताना  नागरिकांनी काळजी घ्यावी :

नाशिक जिल्ह्यातील जनतेला दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

नाशिक : जिल्हा प्रशासन, आरोग्य व पोलीस यंत्रणा यांनी रात्रंदिवस घेतलेली मेहनत तसेच नागरिकांचे सहकार्य यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग काही प्रमाणात रोखण्यास आपण यशस्वी होत आहोत; परंतु या विषाणूचा धोका अजून पूर्णतः टळलेला नसल्याने य विषाणुचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो, त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करताना देखील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हावासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा देताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना विषाणूचे प्रमाण कमी झाले असले तरी या विषाणूचा प्रादुर्भाव पुर्णतः संपलेला नाही. दिवाळीचा सण साजरा करताना नागरिकांनी या परिस्थितीचे भान ठेवून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही पालकमंत्री भुजबळ म्हणाले यावेळी केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन दुकानदारांनी देखील विना मास्क असलेल्या व्यक्तींना वस्तूंची विक्री करून नये, तसेच जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणाना सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत. यादृष्टीने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. जेणेकरून दिवाळी सणांच्या दिवसात मास्कचा वापर करून स्वतःसोबत इतरांच्याही आरोग्याच्या रक्षणाची जबाबदारी नागरिकांनी घ्यावी, असे सांगून  पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, दिवाळी सणात फटाक्यांच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. कारण कोरोनाचा विषाणू हा फुफ्फुसावर मारा करीत असतो, त्यामुळे कोरोनाबाधित आणि कोमॉर्बिड लोकांना या धुराचा त्रास होण्याची शक्यता जास्त असल्याने मोठ्या आवाजाची व प्रदूषण निर्माण करणाऱ्या फटाक्यांचा वापर कमीत कमी करावा. तसेच फटाके फोडताना लहान मुलांची काळजी घेण्यात यावी आणि सॅनिटाईजर हे ज्वलनशील असल्याने फटाक्यांजवळ सॅनिटाईजरचा वापर करू नये. दिवाळीचा सण आनंदात व उत्साहात साजरा करण्यासाठी शासनास व प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करण्याचेही आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

Previous Post

सारसोळे गावातील मच्छि मार्केटजवळील फेरीविक्रेत्यांवर कारवाई करा : मनोज मेहेर

Next Post

धोकादायक इमारतींना मिळणार 4 एफएसआय

Next Post
आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नवी मुंबईत लवकरच कोरोना चाचणी केंद्र : आ मंदाताई म्हात्रे

धोकादायक इमारतींना मिळणार 4 एफएसआय

साईश्रध्दा सोसायटीमागील भुखंड क्रं २०५ वरील पडीक इमारत परिसराची सफाई करण्याची गणेश भगत यांची मागणी

साईश्रध्दा सोसायटीमागील भुखंड क्रं २०५ वरील पडीक इमारत परिसराची सफाई करण्याची गणेश भगत यांची मागणी

शिववाहतूक सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिलीप आमलेंच्या हस्ते रिक्षा, टॅक्सी चालकांना दिवाळी साहित्याचे वाटप

शिववाहतूक सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिलीप आमलेंच्या हस्ते रिक्षा, टॅक्सी चालकांना दिवाळी साहित्याचे वाटप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com