
नवी मुंबई : प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६ ए मध्ये साईश्रध्दा सोसायटीमागील भुखंड क्रं २०५ वरील पडीक इमारत परिसराची सफाई करण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी लेखी निवेदनातून महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नेरूळ नोडमध्ये प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६ ए मध्ये साईश्रध्दा ही गृहनिर्माण सोसायटी आहे. या सोसायटीच्या पाठीमागील बाजूस भुखंड क्रं २०५ वर पडीक इमारत आहे. या पडीक इमारतीच्या सभोवताली जंगली झुडूपे, जंगली गवत, रॅबिट व डेब्रिज पडलेले आहे. या पडीक इमारतीमुळे सभोवतालच्या सोसायटीतील रहीवाशांना त्रास होत असून त्यांच्या जिवितास धोका निर्माण झालेला आहे. या पडीक इमारतीमुळे रहीवाशांना डासांचा त्रास होत असून साथीच्या आजाराचाही सामना करावा लागत आहे. या पडीक इमारतीमुळे साप, नाग व अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांचाही उद्रेक वाढीस लागला आहे. शेजारच्या गृहनिर्माण सोसायटीतील सदनिकांमध्ये साप व नाग येवू लागल्याने रहीवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या सोसायटीतील रहीवाशांनी माझ्याकडे त्यांना जाणवणाऱ्या त्रासाबाबत लेखी निवेदनही सादर केले आहे. आपण या पडीक इमारतीच्या सभोवताली असणाऱ्या सर्व परिसराची सफाई करून स्थानिक रहीवाशांची त्रासातून मुक्तता करावी. येथे सफाई झाल्यास परिसराचा बकालपणा संपुष्ठात येईल व स्वच्छता अभियानालाही हातभार लागेल. या परिसराची लवकरात लवकर सफाई करण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी केली आहे.