
नवी मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ७ महिन्यात प्रत्येक गोर गरीब नागरिकांना अन्न धान्ये तसेच नवी मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकाना आर्थिकदृष्ट्या विशेष सहकार्य करणारे शिवसेना नवी मुंबई व विजय नाहटा फाऊंडेशनच्या सहाय्याने शिवसेना उपनेते तथा राज्यमंत्री विजय नाहटा साहेब यांच्या विशेष सहकार्याने बेलापुर विधानसभा क्षेत्रातील अनेक विभागातील गोर गरीब नागरिकांना तसेच रिक्षा टॅक्सी चालक व इतर वाहक साफसफाई कामगार , घरकाम करणाऱ्या महिला यांना दिवाळीचे फराळ बनविण्यासाठी वस्तू रूपाने साखर, मैदा ,रवा, खोबरे, भाजके चिवडा पोहे, डालडा, चिवडा मसाला, चकली मसाला या वस्तुचे मोफत वाटप शिवसेना शाखाप्रमुख तसेच शिवसेनेच्या शिववाहतूक सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि रिक्षा टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्था नवी मुंबईचे अध्यक्ष दिलीप किसनराव आमले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
लॉकडाऊन मुळे अनेक लोकांचे रोजगार बंद झाले. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत असताना विजय नाहटा यांच्या असे लक्षात आले की बरेचसे हातावर पोट असणारी कुटुंबं आणि ज्यांच्यापर्यंत आतापर्यंत कुठल्याही प्रकारची उत्पन्नाची साधने नाही, रोजगार बंद अशा गोरगरीब नागरिकांना दिवाळी निमित्ताने वस्तू देण्याची नितांत गरज आहे . याच आधारे मोफत दिवाळीचे फराळ बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू वाटप करण्याचा संकल्प शिवसेना उपनेते तथा राज्य मंत्री विजय नाहटा यांच्या माध्यमातून करण्यात आले. दिलिप किसनराव आमले यांच्या हस्ते दिवाळी सामानाचे वाटप झाले, यावेळी नवी मुंबई विभागातील अनेक हातावर पोट असलेले तसेच रिक्षा टँक्सी चालक तसेच महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
सोपान जेजुरकर, अर्जुन डुकरे, सुनिल लाड, सय्यद श्री शाम शेलार, शकिल शेख, कनोजिया, शाम पाटील, रामनाथ माने, विठ्ठल सलते, काशिनाथ दुबे, अरूण कबाडी, सौ सुनिता कापसे, सौ. अश्विनी शिनगारे, श्री आलका बाली या सर्व पदाधिकारी यांनी कोरोना महामारी असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवुन सभासदांना दिवाळी सामान वाटप करण्यास विशेष सहकार्य केले. विजय नाहटांनी दिवाळी सामान दिले म्हणून रिक्षा चालकाच्या घरी आनंदाने कोरोना काळात सुद्धा दिवाळी साजरी होणार असल्याची प्रतिक्रिया दिलीप किसनराव आमले यांनी यावेळी व्यक्त केली.