
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्या जंयतीचे पर्यायाने बालदिनाचे निमित्त साधून नेरूळ कॉंग्रेसच्या वतीने लहान मुलांसमवेत बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.
नेरूळ सेक्टर २ येथील कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या कॉंग्रेस जनसंपर्क कार्यालयात या बालदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विभागातील लहान मुलांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले व केक कापून लहान मुलांसमवेत हा बालदिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या भांडेकर यांच्यासह सारीका धोंडे, मंगल बागडे, अनिता गांगुर्डे, सीमा वाघ, विमल कांबळे, शेवंता मोरे, पांचाळ काकू, कल्पना जाधव, सुरेखा मोहिते यांनी परिश्रम घेतले.