• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, February 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 14, 2020

अनधिकृत मार्केट उभारणीचा खर्च पालिका अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची विधानसभा अध्यक्ष नाना पटोळेंकडे मागणी

adminbyadmin
in Uncategorized
0
अनधिकृत मार्केट उभारणीचा खर्च पालिका अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची विधानसभा अध्यक्ष नाना पटोळेंकडे मागणी

ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांचा गेली अडीच वर्षे महापालिका मुख्यालय ते मंत्रालय सतत पाठपुरावा

नवी मुंबई : सिडको मालकीच्या केवळ मार्केटसाठीच आरक्षित असलेल्या व नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरीत न झालेल्या भुखंडावर अनधिकृतरित्या मार्केट उभारणी करून (नंतर ते मार्केट पाडण्यात आले) नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या अंदाजे २२ ते २५ लाख रूपयांची धुळधाण करण्यात आली. यास  जबाबदार असणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करून वाया गेलेला निधी वसूल करणेबाबत तसेच पालिका प्रशासनाची दिशाभूल केली म्हणून पालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित दोषी घटकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणेविषयी महापालिका प्रशासनाला आदेश देण्याची मागणी नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

या विषयाबाबत जून २०१८ ते आजपर्यत या विषयाचा पत्रकार संदीप खांडगेपाटील हे नवी मुंबई महापालिका ते मंत्रालय सतत पाठपुरावा करत असल्याने हा विषय सर्वाचाच तोंडपाठ झाला आहे. करदात्या नवी मुंबईकरांनी आपल्या कराचा भरणा केलेल्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या तिजोरीतील अंदाजे २२ ते२५  लाख रूपये मातीमोल होवूनही संबंधित नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करून संबंधित पैशाची वसूली होत नसल्याने पत्रकार संदीप खांडगेपाटील हे आजही सरकारदरबारी पाठपुरावा करत आहेत. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर पांघरूण घातले जात असल्याने, पालिकेच्या २२ ते २५ लाखाचा चुराडा होवूनही पैसे वसूलीस व पालिका प्रशासनाची भुखंड हस्तांतरीत न होताही अनधिकृतरित्या मार्केट बांधून पालिकेची फसवणूक करूनही फौजदारी गुन्हा संबंधितांच्या विरोधात दाखल करण्यासटाळाटाळ केली जात असल्याने महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष या नात्याने आता आपणास साकडे घालत आहोत. आपणच आता करदात्या नवी मुंबईकरांना न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनाच्या सुरूवातीलाच विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्याकडे केली आहे.

नेरूळ सेक्टर ६ मध्ये सिडको वसाहतीमधील वरूणा, हिमालय या सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या मध्यभागी व दत्तगुरू सोसायटीच्या लगत मार्केटसाठीच आरक्षित असलेला भुखंड सिडकोच्या मालकीचा असतानाही व तो मार्केटसाठीच आरक्षित असलेला भुखंड सिडकोने महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत केलेला नसतानाही महापालिका अधिकाऱ्यांनी प्रशासनाची सर्व वस्तूस्थिती माहिती असतानाही जाणिवपूर्वक दिशाभूल केली. मार्केटबाबत ठराव आणला गेला, ठरावाला  मंजुरी मिळविली, टेंडर काढले. अंदाजे २२ ते २५ लाख रूपये खर्च करून ते मार्केट बांधण्यातही आले. भुखंड सिडकोचा असताना तत्कालीन शहर अभियंत्यापासून सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी मनमानीपणा जाणिवपूर्वक करत पालिका प्रशासनाची दिशाभूल केली. मार्केटचे बांधकाम करण्यापूर्वी कागदपत्रांची छाननी झाली नाही का,  सिडकोच्या मार्केटसाठीच आरक्षित भुखंडावर भुखंड हस्तांतरीत होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने अंदाजे २२ ते २५ लाख रूपये खर्च करून मार्केट उभारले. मार्केटसाठीच आरक्षित असलेल्या भुखंडाचे सिडकोकडून महापालिकेकडून हस्तांतर होणेपूर्वीच मार्केट बांधल्याने हे मार्केट अनधिकृत ठरले व या अनधिकृत मार्केटवर स्वत:च हातोडा चालविण्याची व मार्केट पाडण्याची नामुष्की शुक्रवार, दि. ८ जून २०१८ रोजी प्रथमच महापालिका प्रशासनावर आली. या अनागोंदी कारभारामुळे महापालिका प्रशासनाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याचे पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. 

हा जाणिवपूर्वक पाण्यात गेलेला निधी हा करदात्या नवी मुंबईकरांच्या घामाचा पैसा आहे. याप्रकरणी मार्केट मंजूर करणारे, महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात व महासभेत मंजुरीला प्रस्ताव पाठविणारे तसेच मार्केटसाठी ठेकेदाराला देयक मंजुर करणारे शहर अभियंत्यापासून जे जे महापालिका अधिकारी जबाबदार आहेत, त्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करून महापालिकेचा वाया गेलेला निधी त्यांच्या वेतनातून, वेळ पडल्यास पीएफमधील पैसा काढून वसूल करावा. यातील दोषी कोणी अधिकारी सेवानिवृत्त झाले असतील तर त्यांच्या संपत्तीचा लिलाव करून हा निधी महापालिकेच्या तिजोरीत जमा करावा, यासाठी हे निवेदन सादर करत असल्याचे पत्रकार खांडगेपाटील यांनी म्हटले आहे.

नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडकोच्या जागेवर महापालिकेने बांधलेले मार्केट तोडण्याची नामुष्की महापालिकेवर आली. करदात्या नवी मुंबईकरांचे सुमारे २२ ते २५ लाख पाण्यात गेले. त्यामुळे याप्रकरणी दोषी असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करून मार्केटसाठी पाण्यात गेलेला लाखो रूपये खर्च संबंधितांकडून वसूल होणे आवश्यक आहे. या मार्केटकरिता महापालिका प्रशासनाचे अंदाजे २२ ते २५ लाख रूपये खर्च झाले आहेत. हा पैसा सर्वसामान्य करदात्या नवी मुंबईकरांचा आहे. सिडकोकडून भुखंड हस्तांतरीत न होताच त्यावर मार्केट का बांधण्यात आले व त्या जागेवर २२ ते २५ लाख रूपये महापालिका प्रशासनाचे खर्च झाले. ते मार्केट अनधिकृत ठरले व महापालिकेला ते मार्केट पाडावे लागले. महापालिकेच्या ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेवून कार्यवाही केली, त्या सर्व अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करून मार्केटवर झालेला खर्च संबंधितांकडून लवकरात लवकर वसूल करण्यात यावा यासाठी आपण महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित विभागाला आदेश द्यावेत आणि याबाबत महापालिका प्रशासनाने काय कारवाई केली याचा लेखी अहवाल आम्हास प्राप्त करून द्यावा, याबाबत आपण आम्हा नवी मुंबईकरांना न्याय मिळवून द्यावा आणि करदात्या नवी मुंबईकरांचे पाण्यात गेलेले पैसे संबंधितांकडून वसूल करून पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यासाठी आम्ही करत असलेल्या पाठपुराव्याला न्याय द्यावा अशी मागणी पत्रकार खांडगेपाटील यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्याकडे केली आहे.

Previous Post

नवी मुंबईत शनिवारी कोरोना रूग्णांची संख्या ९१

Next Post

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या दिवाळे पगवाले जेट्टीचे लोकार्पण

Next Post
आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नवी मुंबईत लवकरच कोरोना चाचणी केंद्र : आ मंदाताई म्हात्रे

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या दिवाळे पगवाले जेट्टीचे लोकार्पण

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळांतील ४२ विद्यार्थ्यांनी फडकवला उज्ज्वल यशाचा झेंडा

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळांतील ४२ विद्यार्थ्यांनी फडकवला उज्ज्वल यशाचा झेंडा

कोरोना रूग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामध्ये कोव्हिड-१९ मास स्क्रिनींग कॅम्प  राबवा : मनोज मेहेर

नवी मुंबईत रविवारी कोरोना रूग्णांची संख्या ८९

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com