
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७६
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील जनसेवक गणेश भगत यांनी खारघरमधील फणसपाडा, चाफेवाडी या आदिवासी भागातील आदिवासी बांधवांना दिवाळीच्या शुभदिनी दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले.शनिवार दिनांक-१४/११/२० रोजी सकाळी खारघरमधील आदिवासी बांधवांना साखर, रवा, उटणे या साहित्याचे गणेश भगत यांनी जावून वितरण केले. यावेळी गणेश भगत यांच्यासोबत विकास तिकोणे, अशोक गांडाळ, राजेंद्र तुरे, सुदिप बांदरे, शुभम पाटणकर, मंगेश कदम, जयेंद्र नागरजे, रविंद्र भगत आदी उपस्थित होते.कोरोना काळात सर्वच हतबल झाले आहेत. प्रत्येकाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांना दिवाळी काळात दिलासा मिळावा यासाठी त्या बांधवांच्या घरोघरी जावून या साहित्याचे वाटप केले असल्याचे गणेश भगत यांनी यावेळी सांगितले. दिवाळीच्या दिनी आदिवासींच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याने खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाल्याचे गणेश भगत यावेळी म्हणाले.