• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, February 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 16, 2020

ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी रवींद्र सावंतांचे शिवसेना नेते खा. संजय राऊतांना साकडे

adminbyadmin
in Uncategorized
0
ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी रवींद्र सावंतांचे शिवसेना  नेते खा. संजय राऊतांना साकडे

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पाठविलेल्या ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेच्या प्रस्तावाला मंत्रालयीन पातळीवर मंजुरी मिळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सहकार्य करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व कामगार नेते रवींद्र सावंत यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

भाऊबीजेच्या दिनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी जावून कामगार नेते रवींद्र सावंत यांनी ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी राज्य सरकारकडे महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावावर मंत्रालयीन पातळीवर सहकार्य करण्याची गळ रवींद्र सावंत यांनी खासदार संजय राऊत यांना घातली.

यावेळी खासदार संजय राऊत यांना दिलेल्या निवेदनात कामगार नेते रवींद्र सावंत यांनी म्हटले आहे की, नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आलेला आहे. महापालिका सेवेत काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्यासाठी नवी मुंबई इंटकने महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. शिवसेनेनेही याप्रकरणी बहूमोल सहकार्य लाभल्याचे जगजाहिर आहे. आपण शिवसेना नेते तसेच कामगार प्रश्‍नांची जाण तसेच कळवळा असणारे नेतृत्व आहे. तसेच महाविकास आघाडीचे राज्यस्तरीय नेते आहात. ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेबाबत आपणास अधिक सांगण्याची गरज नाही. आपण स्वत: या शहराची जडणघडण पूर्णपणे जाणून आहात. या प्रश्‍नांची आपणास सखोल माहिती आहे. याप्रकरणी काँग्रेसचे नवी मुंबईतील काँग्रेसचे नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणिस संतोष शेट्टी यांनीही पाठपुरावा करताना आम्हाला साथ दिलेली आहे. सतत मार्गदर्शन करत असतात. महापालिका व मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करत असताना ते सतत आमच्या सोबत असतात. हा ठराव नुकताच मंत्रालयीन पातळीवर महापालिका प्रशासनाने पाठविलेला आहे. याप्रश्‍नी आम्ही इंटकच्या वतीने शिवसेना  उपनेते विजय नाहटा व शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनाही याप्रकरणी निवेदन सादर केलेले आहे. काँग्रेसचे नेते व राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटिवार यांनीही याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेबांनाही पत्र सादर केलेले आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे व काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात हेही याप्रकरणी पाठपुरावा करत असल्याची माहिती रवींद्र सावंत यांनी खासदार संजय राऊत यांना दिली.

नवी मुंबई महापालिकेत शिक्षकही गेल्या काही वर्षापासून ठोक मानधनावर काम करत आहे. या कामगारांसमवेत संबंधित शिक्षकांचीही सेवा कायम होणे आवश्यक असल्याचे सांगून रवींद्र सावंत पुढे म्हणाले की, आम्ही स्वत: काँग्रेसच्या माध्यमातून तसेच मंत्रालयातील काँग्रेसच्या मान्यवरांकडून या प्रश्‍नाला सातत्याने चालना देत आहोत. आपण स्वत: मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या माध्यमातून या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळण्यासाठी आम्हाला सहकार्य करून संबधित ठोक मानधनावरील कामगारांना सहकार्य करावे. काँग्रेस नेते व विधानसभा अध्यक्ष नाना पटोळेसाहेब यांच्याच दालनात याविषयावर नवी मुंबई इंटकचे पदाधिकारी, महापालिका आयुक्त व अन्य अधिकारी यांची त्यांच्याच उपस्थितीत बैठकही झालेली आहे. महापालिका प्रशासनाने  याबाबतचा  प्रस्ताव मंत्रालयात पाठविला असून आपण आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा करून या कामाला मार्गी लावण्यास आम्हाला सहकार्य करावे आणि ठोक मानधनावरील कामगारांना उपकृत करावे अशी मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे.

Previous Post

नवी मुंबईत सोमवारी कोरोना रूग्णांची संख्या ६१

Next Post

प्रभाग ४२ मध्ये सोसायटी अंतर्गत भागात धुरीकरण करून द्या : सुनिता हांडेपाटील

Next Post
कोपरखैराणे, प्रभाग 42 मधील सेक्टर 16, 17, 22, 23 परिसरात पाहणी अभियान राबवूून वृक्षछाटणी करा

प्रभाग ४२ मध्ये सोसायटी अंतर्गत भागात धुरीकरण करून द्या : सुनिता हांडेपाटील

करंजाडेच्या विकासासाठी नागरिकांची पनवेल संघर्ष समितीला साद!

करंजाडेच्या विकासासाठी नागरिकांची पनवेल संघर्ष समितीला साद!

कृषी कायद्याविरोधातील महाराष्ट्राचा लढा देशाला दिशादर्शक ! एच. के. पाटील

कृषी कायद्याविरोधातील महाराष्ट्राचा लढा देशाला दिशादर्शक ! एच. के. पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com