
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : कोरोना महामारीचा आता कायमचा ‘बायबाय’ करण्याच्या उंरठ्यावर नवी मुंबई शहर येवून पोहोचले आहे. भाऊबीजेच्या दिवशी सोमवारी नवी मुंबईत कोरोनाचे अवघे ६१ रूग्ण सापडल्याने ही दिवाळी नवी मुंबईकरांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी ठरण्याची शक्यता आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासन हे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली करत असलेल्या प्रयत्नांना आता खऱ्या अर्थाने यश येवू लागले आहे.
१७ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेच्या दिनी नवी मुंबई शहरात कोरोनाचे ६१ रूग्ण सापडलेआहेत. यामध्ये नेरूळमध्ये सर्वाधिक १७ रूग्ण तर त्याखालोखाल वाशी विभागात १२ रूग्ण, बेलापुर विभागात १० कोरोना रूग्ण आढळले आहेत. तुर्भे विभागात ६ रूग्ण, कोपरखैराणे व घणसोली विभागात प्रत्येकी ४, ऐरोली विभागात ८ कोरोना रूग्ण आढळून आले. विशेष म्हणजे दिघा विभागात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.
नवी मुंबई शहराला कोरोना मुक्त करण्यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर हे गेल्या काही महिन्यापासून पालिका प्रशासनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसमवेत अथक प्रयत्न करत आहे. शनिवार-रविवार सुट्टीचा दिवस असतानाही गेल्या काही महिन्यापासून पालिका आयुक्त अभिजित बांगर हे स्वत: सुट्टी न घेता कोरोनाविरोधात कार्यरत आहेत. आज अवघे कोरोनाचे ६१ रूग्ण आढळून आल्याने नवी मुंबई शहर आपणास लवकरच कोरोनामुक्त झालेले पहावयास मिळणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी व्यक्त केली असून पालिका आयुक्त अभिजित बांगर व पालिका प्रशासनाचे कोरोना नियत्रंणात केलेल्या परिश्रमाचे श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये असे अशोक गावडे यांनी यावेळी म्हटले आहे.