
नवी मुंबई : लॉकडाऊन काळात तसेच कोरोना पर्वात सातत्याने जनसेवेत अग्रेसर असतानाही प्रसिध्दीपासून चार हात जाणिवपूर्वक लांब राहणाऱ्या भाजपाच्या गणेश भगत यांनी प्रभाग ९६ मध्ये पुन्हा धुरीकरण अभियान राबविले आहे. सलग चार दिवस राबविण्यात आलेल्या अभियानात प्रभागाचा कानाकोपरा गणेश भगत यांनी धुरीकरणाच्या माध्यमातून पिंजून काढताना स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात संपूर्ण प्रभागात धुरीकरण करून घेण्याची जनसेवक गणेश भगत यांची ही चौथी वेळ आहे.
धुरीकरणाच्या चौथ्या टप्प्यामध्ये जनसेवक गणेश भगत यांनी प्रभागातील सेक्टर १६, सेक्टर १६ ए, सेक्टर १८, पामबीच लगतचा सर्व्हिस रोड, मार्केट तसेच सार्वजनिक जागी धुरीकरण करून घेतले. डासांच्या वाढत्या उपद्रवाबाबत स्थानिक रहीवाशांनी जनसेवक गणेश भगत यांनी तात्काळ सर्व प्रभागात, कानाकोपऱ्यात, गृहनिर्माण सोसायट्याच्या अंर्तगत भागात, सार्वजनिक ठिकाणी, गटारे यामध्ये धुरीकरण करून घेतले. यावेळी धुरीकरण अभियानात जनसेवक गणेश भगत यांच्यासमवेत अशोक गांडाळ, विकास तिकोणे, सागर मोहिते, राजेंद्र तुरे, अशोक पिंगळे, जयेंद्र नागरजी आदी सहभागी झाले होते.