
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कोरोना काळात काम करणाऱ्या रूग्णालयीन सफाई कामगारांना प्रोत्साहीत भत्ता वितरीत करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात काम करणाऱ्या सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांना ३०० रूपये दैनंदिन प्रोत्साहित भत्ता देण्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून जाहिरही करण्यात आले होते. तथापि हा प्रोत्साहीत भत्ता महापालिका प्रशासनाकडून केवळ कायम आस्थापनेवरील कामगार व अधिकाऱ्यांना वितरीत करण्यात आला, परंतु रूग्णालयीन सफाई कामगारांना आजतागायत प्रोत्साहीत भत्ता वितरीत करण्यात आलेला नाही.
कोरोना महामारीच्या काळात महापालिका आस्थापनेवरील कायम कर्मचारी व अधिकाऱ्यांप्रमाणेच रूग्णालयीन सफाई कामगारांनीही मोलाची कामगिरी बजावली आहे. जीवघेण्या कोरोना आजारातही स्वत:च्या जिविताची पर्वा न करता नवी मुंबईकरांची या सफाई कामगारांनी सेवा केलेली आहे. परंतु आता महापालिका प्रशासनाला या सफाई कामगारांचा व त्यांच्या सेवेचा विसर पडलेला दिसून येत आहे. कोव्हिड १९ या काळात काम करणाऱ्या सर्व कामगारांना प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रतिदिन ३०० रूपये जाहीर करण्यात आले होते. तथापि हा प्रोत्साहीत भत्ता केवळ पालिका प्रशासनातील कायम कामगारांनाच हा भत्ता वितरीत करून सफाई कामगारांच्या बाबतीत दुजाभाव करण्यात आला असल्याचा आरोप नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी निवेदनातून केला आहे.
महापालिका प्रशासनाने हा दुजाभाव न करता कोरोना काळात काम केलेल्या सफाई कामगारांनाही तात्काळ प्रोत्साहीत भत्ता वितरीत करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी रवींद्र सावंत यांनी निवेदनाच्या अखेरिस पालिका आयुक्त बांगर यांच्याकडे निवेदनाच्या अखेरीस केली आहे.