
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : नेरूळ पश्चिममधील राजकीय, सामाजिक क्षेत्रात लहान बालकांपासून ज्येष्ठांपर्यत रतन मांडवे व सुनिता मांडवे हे परिचित असे नाव. कोरोना काळात मार्चच्या मध्यापासून ते अगदी कालपरवापर्यत प्रभाग ८७ मधील नागरिकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या मांडवे दांपत्याला अखेर काही दिवसापूर्वी कोरोनाने गाठलेच, परंतु कोरोनावर मात करत मांडवे दांपत्य आता घरी परतले असून लवकरच जनसेवेत सक्रिय होणार असल्याचा निर्धार मांडवे दांपत्यानी व्यक्त केल्याने कोरोनावर त्यांनी खऱ्या अर्थाने मात केल्याचे नेरूळ पश्चिम परिसरात बोलले जात आहे.
माजी नगरसेविका व शिवसेनेच्या महिला उपशहरसंघटक असलेल्या सुनिता रतन मांडवे या शुक्रवारी (दि. २७ नोव्हेंबर) रोजी तेरणा रूग्णालयातून घरी परतल्या. तीनच दिवसापूर्वी त्यांचे यजमान, शिवसेनेचे माजी नगरसेवक, शिवसेना विभागप्रमुख रतन नामदेव मांडवे हेही कोरोनावर मात करून तेरणा रूग्णालयातून घरी परतले होते. कोरोना झाल्यावर कोण खऱ्या अर्थाने आपली काळजी घेते अथवा कोण आपल्या गावाला जावून प्रभागातील जनतेला वाऱ्यावर सोडते याची त्या त्या विभागातील जनतेला जाणिव झाली.
मार्चच्या मध्यापासून नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सौ. सुनिता मांडवे व रतन मांडवे यांनी एकही दिवस आपला प्रभाग सोडला नाही. प्रभागातील जनतेला स्वस्त दरात भाज्या उपलब्ध करून देणे, कोरोना होवू नये म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गोळ्यांचे वाटप करणे, मॉस्कचे वाटप करणे, विभागातील जनतेसाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तसेच रस्त्यावर जंतुनाशक फवारणी करून घेणे, डासांचा उद्रेक होवू नये यासाठी धुरीकरण मोहीम स्वखर्चाने राबविणे, गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात कोरोना चाचणी शिबिरांचे आयोजन करणे, पदपथावर तसेच गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात ब्लिचिंग पावडर टाकून शेवाळ होणार नाही याची मांडवे परिवाराने काळजी घेतली. नुकतीच महाराष्ट्र सरकारच्या ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ या अभियानांर्तगत सौ. सुनिता मांडवे यांनी घरोघरी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत जावून जनतेशी सुसंवाद साधत कोरोना पार्श्वभूमीवर त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महागाई काळात स्थानिक जनतेला दिवाळी फराळ बनविण्यासाठी स्वस्त दरात रतन मांडवे यांनी साहित्य उपलब्ध करून दिले.
याशिवाय प्रभागात कोणाला कोरोना झाल्यास त्यास रूग्णालयात अॅडमिशन करून देणे, आयसीयू बेडस, व्हेंन्टिलेटर, ऑक्सिजन उपलब्ध करून देणे, कोरोना रूग्णाला उपचारादरम्यान रूग्णालयात कोव्हिड सेंटरमध्ये काही त्रास तर होत नाही ना, याची सतत खातरजमा करून घेणे, कोरोना रूग्णाच्या परिवाराची काळजी घेणे आदी कामात प्रभाग ८७ मध्ये मांडवे दांपत्यांनी स्वत:ला अक्षरश झोकून दिले होते. मार्च ते नोव्हेंबर या सात महिन्याच्या कालावधीत कोरोना महामारीमध्ये स्वत:च्या जिविताची काळजी न घेता खऱ्या अर्थाने मांडवे दांपत्य प्रभाग ८७ मधील नागरिकांसाठी झटताना नेरूळ पश्चिममधील अनेकांनी जवळून पाहिले आणि अनुभवलेही. मात्र कोरोनाविरोधात कार्य करताना, जनसेवा करताना मांडवे परिवाराला कोरोनाने गाठले. आपल्यामुळे इतरांना त्रास होवू नये, कोणाला कोरोनाची लागण होवू नये म्हणून होम क्वारन्टाईन न होता रतन मांडवे आणि सुनिता मांडवे यांनी उपचारासाठी तेरणा रूग्णालय गाठले. उपचारासाठी मांडवे दांपत्य रूग्णालयात असले तरी फोनवरून जनसेवा करण्यात खंड काही पडला नव्हता. प्रभागातील एक महिला कोरोनावरील उपचारासाठी तेरणा रूग्णालयात असताना तिचे बिल कमी करून देण्याचे काम रतन मांडवे यांनी केले. फोनवरून पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क करून नागरी सुविधांबाबत रतन मांडवे आपली आग्रही भूमिका सातत्याने मांडतच होते.
कोरोनावर यशस्वीपणे मात करून मांडवे दांपत्य आता घरी परतले आहे. आठ दिवसानंतर पुन्हा जोमाने जनसेवेला सुरूवात करण्याचा निर्धार रतन मांडवे व सौ. सुनिता मांडवे यांनी व्यक्त केल्यामुळे कोरोनाही मांडवे दांपत्याच्या जनसेवेला अडथळा निर्माण करू शकणार नसल्याचे पुन्हा एकवार स्पष्ट झाले आहे.