
घाटकोपर : पवई नोडमधील पवई आरे रोड जोडणारा मिठी नदीवरील ब्रिटिश कालिन पूल कोसळण्याच्या मार्गावर असून याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिक भयभीत झाले असून या पूला संदर्भात प्रशासन योग्य दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. सदर पूल जीर्ण झाल्याने 04 मे, 2019 पासून अवजड वाहनांकरिता बंद करण्यात आला होता, त्यामुळे बेस्ट बसेस ची वाहतूक सुद्धा मागील 20 महिन्यांपासून बंद आहे. परंतु त्या जागी नवीन पूल उभारणीसाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. अशातच सदर जीर्ण पुलाच्या खालून मलनिःस्सारण वाहिनीचे खोदकाम चालू करण्यात आले, त्यामुळे सदर जीर्ण झालेल्या पुलाला हादरे बसून, सदर पुलाची पडझड चालू झाली आहे. त्यामुळे आजपासून सदर पूल संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिक जीव मुठीत धरून या पूलावरून ये जा करत आहेत सदर जीर्ण पुलाच्या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनातर्फे कोणताही प्रस्ताव स्थायी समितीमार्फत आजपर्यंत मंजूर झालेला नाही. त्यामुळे हा पूल कोसळून घातपात झाल्यावर प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहे
**
शिवरेज प्रोजेक्टचे पाईप टाकण्याचे काम सद्या सुरू असून या कामात होणाऱ्या हादऱ्यामुळे पुलाला धक्का बसला आहे . पुढील दोन आठवड्यात पुलाच्या कामाचे टेंडर पास करून पुलाचे काम करणार आहे. या मार्गावर सद्या जड वाहने बंद केली असून फक्त दुचाकींना वाहतूक करता येणार आहे. इमर्जन्सी मध्ये एम्बोलेन्सला जाता येईल.
– चंद्रावती मोरे – स्थानिक नगरसेविका. बाजार उद्दान समिती अध्यक्षा