
मुंबई : निलेश मोरे
साऊथ कोरिया मध्ये नुकतेच संपन्न झालेल्या २०२० खुल्या ऑनलाईन सिओल कप इंटरनॅशनल तायक्वांडो स्पर्धेमध्ये सिद्धकला तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी यशस्वी कामगिरी केली आहे. सिद्धकला तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी देश परदेशातील स्पर्धेत सहभाग घेऊन यश संपादन केले आहे.
सिद्धकलाने एकामागे एक विविध स्थरांवर यश मिळवत पुन्हा एकदा जोरदार कामगीरी नुकत्याच पार पडलेल्या २०२० खुल्या ऑनलाईन सिओल कप इंटरनॅशनल तायक्वांडो स्पर्धेमध्ये साऊथ कोरिया मध्ये भरवलेल्या स्पर्धेत सुप्रसिद्ध असलेल्या सिद्धकला तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता, यात जगभरातून विविध राष्ट्रांच्या पंचांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता ही स्पर्धा दिनांक २१ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण जगभरातून विविध राष्ट्रांच्या खेळाडूंनी विविध वयोगटात सहभाग घेतला होता तसेच सिद्धकला तायक्वांडो अकादमीचे संघ प्रमुख मास्टर जयेश वेल्हाळ सर ह्यांच्या अधिपत्याखाली मुख्य प्रशिक्षक निशांत शिंदे आणि सहप्रशिक्षक विनीत सावंत, विक्रांत देसाई, क्रुपेश रणक्षेत्रे, स्वप्निल शिंदे, फ्रॅंक कनाडीया यांच्या मार्गदर्शनाखाली खालील प्रमाणे पदक कमावलेले विजेता खेळाडू सुवर्ण पदक विजेते खेळाडू तनिष्का वेल्हाळ, अंगद नाडकर्णी रजत पदक विजेते खेळाडू जियाना पडीयार, ऐश्वर्या रौटेला , कांस्य पदक विजेते खेळाडू तियारा बत्रा, निल अग्रवाल , अमायरा पेंटर या सर्व खेळाडूंचे व त्यांच्या पालकांचे तसेच प्रशिक्षकांचे सिद्धकला तायक्वांडो अकादमीचे संघ प्रमुख मास्टर जयेश वेल्हाळ यांनी अभिनंदन केले आहे.