• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, February 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 30, 2020

महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा कुटील डाव!: सचिन सावंत

adminbyadmin
in Uncategorized
0
संकट काळातही भाजपाकडून गोरगरिबांची फसवणूक तिडीक आणणारी!: सचिन सावंत

उद्योजक व बॉलिवूडमध्ये भीती निर्माण करण्याचे अजयकुमार बिश्त यांचे षडयंत्र.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाचा कुहेतू ओळखावा.
 
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिश्त हे मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा त्यांचा डाव आहे. उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो. त्यांचा हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योगक तसेच बॉलिवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योजक, बॉलिवूड यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र मागील काही महिन्यापासून केले जात असल्याचे उघड झाले आहे. एनसीबीच्या माध्यमातून बॉलिवूडला बदनाम करण्याचे प्रयत्न सुशांतसिंग प्रकरणापासून कसे केले जात आहेत हेही स्पष्ट झाले आहे. मोदी सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या मोहिमेत अजकुमार बिष्ट यांचाही पुढाकार राहिलेला आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न २०१४ पासूनच होतो आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र असेच षडयंत्र करुन गुजरातला नेले गेले. आता बॉलिवूडचे महत्व कमी करुन उत्तर प्रदेशमध्ये दुसरा चित्रपट उद्योग निर्माण करण्याचा डाव आहे. त्यांच्या मुंबई भेटीत ते अशीच भीती दाखवून महाराष्ट्रातील गुंतवणूक व बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्यासाठी घाट घालतील. महाराष्ट्राची अधोगती करण्याचा त्यांचा कुहेतू लक्षात घेऊन मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच महाविकास आघाडी सरकारने उद्योगपती व बॉलिवूडच्या पाठीशी खंबरपणे उभे राहण्याची गरज आहे.
अजयकुमार बिश्त यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशात कायदा सुव्यव्यस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. दलित, महिला, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार वाढल्याचे देशाने पाहिले आहेत. दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत. सामाजिक एकोपा राहिलेला नसून उत्तर प्रदेश हे उत्तम प्रदेश नसून जंगलराज झाले आहे. बिश्त यांच्यामुळे विद्वेषाचे वातावरण उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झाले आहे. आता केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रातील वातावरण दुषीत करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असेही सावंत म्हणाले. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील उद्योजकांमध्ये षडयंत्राने दहशत निर्माण करण्याऐवजी स्वतःच्या राज्यात उद्योगांकरिता अनुकूल वातावरण तयार करावे, असा सल्लाही सावंत यांनी दिला.

Previous Post

१ ते १६ डिसेंबरपर्यंत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान

Next Post

सामाजिक बांधिलकी जोपासत भगत दापंत्याने रक्तदान आणि धान्यवाटप करून केला आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा

Next Post
सामाजिक बांधिलकी जोपासत भगत दापंत्याने रक्तदान आणि धान्यवाटप करून केला आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा

सामाजिक बांधिलकी जोपासत भगत दापंत्याने रक्तदान आणि धान्यवाटप करून केला आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा

ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी नगरविकास मंत्र्यांना साकडे

ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी नगरविकास मंत्र्यांना साकडे

प्रभाग ८६च्या कॉंग्रेसच्या वॉर्ड अध्यक्षपदी श्यामसुंदर पाटील यांची नियुक्ती

प्रभाग ८६च्या कॉंग्रेसच्या वॉर्ड अध्यक्षपदी श्यामसुंदर पाटील यांची नियुक्ती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com