
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : ९८२००९६५७३
नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या भाजप सरकार विरुद्ध सोमवारी (दि. ३० नोव्हेंबर )आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई प्रभारी शशिकांत शिंदे आणि नवी मुंबई युवक प्रभारी तेजस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबई युवक जिल्हा अध्यक्ष राजेश भोर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नवी मुंबई राष्ट्रवादी चे निरीक्षक प्रशांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम आगा, नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेश भोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथाडी जनरल संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष किशोर (अन्नु) आंग्रे, जिल्हा उपाध्यक्ष तेजस फणसे, जिल्हा सरचिटणीस प्रशांत सोळस्कर, वाशी तालुका अध्यक्ष मिट्टू भाई नागपाल, विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे, युवती जिल्हाध्यक्षा श्वेताताई खरात, नवी मुंबई बेलापूर विधानसभा अध्यक्ष जतीन धनावडे आणि उपाध्यक्ष आकाश पाटील, युवक कार्यकर्ते उपस्थित होते.