• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 30, 2020

‘मोदी है तो मुमकीन है’ हा भाजपाचा विश्वास लोकशाहीसाठी चिंता वाढवणारा!: सचिन सावंत

adminbyadmin
in Uncategorized
0
जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा : सचिन सावंत

फडणवीस सर्वोच्च न्यायालयावरही प्रभाव पाडू शकतात का?

भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांचे वक्तव्य धक्कादायक व आक्षेपार्ह.

मुंबई : मराठा आरक्षणावरुन भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत वादग्रस्त आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असतानाही देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सत्ता द्या, मी मराठा आरक्षण मिळवून देतो, असे म्हणणे धक्कादायक आणि आक्षेपार्ह आहे. गेल्या सहा वर्षांत ‘मोदी है तो मुमकीन है’ अशा भावनेतून संविधानिक संस्थांवर दबाव आणला जात आहे. यातूनच भाजपा नेत्यांमध्ये आलेला हा विश्वास लोकशाहीसाठी चिंता वाढवणारा आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात प्रलंबित आहे, राज्य सरकारने घटनापीठाची स्थापना करावी यासाठी चारवेळा सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. तरी अजूनही घटनापीठ स्थापन झाले नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे. त्यासाठी निष्णात वकीलांची फौजही काम करत आहे. सरकार या प्रकरणी सर्व प्रयत्न करत असताना काही लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्यातून फडणवीस सर्वोच्च न्यायालयालाही प्रभावीत करु शकतात असेच भाजपा नेत्यांना वाटत आहे असे दिसते,  हा विश्वास अत्यंत धक्कादायक आहे. फडणवीस सत्तेवर असतील तरच मराठा आरक्षण मिळेल अन्यथा नाही असे भाजपा नेते सांगत आहेत. अर्णब गोस्वामी सुद्धा फडणवीस यांचाच सल्ला घेतात का? असा टोला सावंत यांनी लगावला.

मोदी सरकार २०१४ साली सत्तेवर आल्यापासून संविधान, लोकशाहीची सर्व तत्वे पायदळी तुडवली जात आहेत. देशातील स्वायत्त संस्था या सरकारच्या बटीक बनवल्या असून त्यांना सरकारच्या हातच्या कठपुतली बाहुल्या केल्या आहेत. मागील काही वर्षातील घटना पाहता हे प्रकर्षाने जाणवते. जनतेला न्यायपालिकांवर अजूनही विश्वास वाटतो पण भाजपाचे लोक प्रभाव पाडून आपण हवा तसा आणि हवा तो निकाल आणू शकतो असे म्हणत असतील तर ते चिंताजनक आहे, असेही सावंत म्हणाले.

Previous Post

सरप्लस झालेल्या की ठोक मानधनावरील कोणत्या शिक्षकांना न्याय मिळणार?

Next Post

पवई आरे जोडणारा धोकादायक पूल कोसळणार ?

Next Post
पवई आरे जोडणारा धोकादायक पूल कोसळणार ?

पवई आरे जोडणारा धोकादायक पूल कोसळणार ?

शेतकऱ्यांवर लाठीचॉर्ज करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारविरोधात वाशीत राष्ट्रवादी युवकचे आंदोलन

शेतकऱ्यांवर लाठीचॉर्ज करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारविरोधात वाशीत राष्ट्रवादी युवकचे आंदोलन

फुटपाथवरील गरीब गरजूंना ब्लॅंकेट वाटप करून युवकाने केला वाढदिवस साजरा

फुटपाथवरील गरीब गरजूंना ब्लॅंकेट वाटप करून युवकाने केला वाढदिवस साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com