संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ७९ मध्ये ७ मार्च विविध नागरी कामांचे भुमीपुजन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत असून शिवसेनेच्या स्थानिक माजी नगरसेविका रूचा रामचंद्र पाटील यांनी या कामासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
७ मार्च रोजी सांयकाळी ५ वाजता सानपाडा सेक्टर ५ मधील भुखंड क्रं ३ झाशीच्या राणी मैदानावर या कार्यक्रमाचे भूमीपुजन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. प्रभाग ७९ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट पीच व व्हॉली बॉल, फुटबॉल, कबड्डीसाठी कोर्ट, विद्युत व इतर सुविधांच्या कामाचा या भुमीपुजन कार्यक्रमात समावेश आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, माजी सिडको संचालक नामदेव भगत, शिवसेनेचे माजी पालिका गटनेते द्वारकानाथ भोईर, शिवसेना जिल्हा महिला संघठक सौ. रंजना शिंत्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड. मनोहर गायखे, मिलिंद सुर्यराव, शहरप्रमुख विजय माने, शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.माजी नगरसेविका रूचा पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे होत असलेल्या विकासकामांच्या भुमीपुजन कार्यक्रमास सानपाडावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे निमत्रंक शिवसेना उपविभागप्रमुख रामचंद्र शंकर पाटील यांनी केले आहे.