• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 14, 2021

फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा !: नाना पटोले

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचे समर्थन : नाना पटोले

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २०१६-१७ साली फोन टॅपिंग करण्यात आले होते त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता अशी माहिती आपल्याला खाजगी टीव्ही चॅनलकडून मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला असून यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. या प्रकरणी नंबर माझा व अमजद खान असे खोटे नाव वापरण्यात आले होते. या फोन टॅपिंगशी संबंधीत सर्वांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेतील काही महत्वाचे नेते आणि काही आयएएस, आयपीएस अधिकारी यांचेही फोन टॅपिंग केले जात होते. माझा संबंध अंमली पदार्थांच्या तस्करीशी जोडण्याचा प्रयत्न करुन हा निंदनीय व अश्लाष्य प्रकार करण्यात आला आहे. फोन टॅपिंग करताना नावे व पत्ते खोटी तसेच बनावट दाखवून फोन टॅप करण्यात आले. हे फोन टॅपिंग कोणी केले आणि त्यांना परवानगी कोणी दिली ? फोन टॅपिंग करण्याचा उद्देश काय होता ? फोन टॅप करुन एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गुन्हा आहे तसेच हा प्रकार व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे खपवून घेणार नाही. जे कोणी या फोन टॅपिंगशी संबंधीत होते त्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, असेही पटोले म्हणाले.

Previous Post

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे! सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी

Next Post

४ लक्ष कोव्हीड लस खरेदीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे ग्लोबल टेंडर

Next Post
१ ते १६ डिसेंबरपर्यंत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान

४ लक्ष कोव्हीड लस खरेदीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे ग्लोबल टेंडर

प्रभाग ८७ मधील कंडोनिअम अंर्तगत कामे करा : सौ. सुनिता रतन मांडवे

ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तिंना घरी जावून कोरोना लस उपलब्ध करून द्या : सौ. रूपाली किस्मत भगत

वनविभाग व कांदळवनाच्या माध्यमातून सारसोळे ग्रामस्थांच्या रोजगार-व्यवसायासाठी मनोज मेहेर प्रयत्नशील

लोकसंख्या वाढल्याने आता तरी नेरूळ पूर्वेला स्मशानभूमी बांधा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com