संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मौलाना कलाम आझाद विकास महामंडळाच्या योजना व कार्य सर्वसामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी एमआयएमने पुढाकार घेण्याचे ठरविले असून एमआयएमचे एमआयएम महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी आघाडीचे महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन सादर केले आहे. मौलाना कलाम आझाद विकास महामंडळाच्या योजना व कर्जवितरणाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी तसेच ठाणे-कोकण भागात तसेच राज्याच्या इतर भागात महामंडळाच्या योजना सर्वसामान्यांना परिचित करून देण्यासाठी एमआयएम अभियान राबविणार असून त्यात महामंडळाचे कर्मचारी-अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी पाठविण्याचे साकडे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनातून घातले आहे.
मौलाना कलाम आझाद विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातल्या घटकांचा उत्कर्ष व्हावा यासाठी विविध जनकल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. तळागाळातील घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी विविध योजनांसाठी अत्यल्प दरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. अनुदानही दिले जात आहे. तथापि मौलाना कलाम आझाद विकास महामंडळ हे महामंडळ व महामंडळाचे कार्य अजूनही तळागाळातील घटकांना परिचित नाही. त्यामुळे तळागाळातील घटकांच्या उत्कर्षासाठी ठाणे व रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अन्य शहरी व ग्रामीण भागात मौलाना कलाम आझाद विकास महामंडळाचे कार्य व योजना पोहोचविण्याचे एमआयएमचे ध्येय आहे. त्यासाठी सहकार्य करण्याची मागणी निवेदनातून हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.
ठाणे, रायगडसह महाराष्ट्राच्या अन्य शहरी व ग्रामीण भागात मौलाना कलाम आझाद विकास महामंडळाचे कार्य पोहोचविण्यासाठी एमआयएमच्या वतीने शिबिरांचेही आयोजन व्यापक प्रमाणावर करण्याचा एमआयएमचा संकल्प आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी महामंडळाचे अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनातून केली आहे.